दिवाळी विशेष रेल्वे गाड्यांमुळे बसला ‘वंदे भारत’ला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 08:59 IST2025-10-22T08:58:28+5:302025-10-22T08:59:32+5:30

गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ला एक ते दोन तास उशीर होत आहे.  

diwali special trains impacted vande bharat express train | दिवाळी विशेष रेल्वे गाड्यांमुळे बसला ‘वंदे भारत’ला फटका

दिवाळी विशेष रेल्वे गाड्यांमुळे बसला ‘वंदे भारत’ला फटका

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व मार्गावर विशेष (स्पेशल) रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्याचा फटका नियमित धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांसह ‘वंदे भारत’ला बसत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ला एक ते दोन तास उशीर होत आहे.  

सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) येथून सुटणारी मुंबई ते सोलापूर वंदे भारत नियमित वेळेपेक्षा चार तास उशिराने सुटली. यामुळे सोलापूरला रात्री १० वाजून ४० वाजता पोहोचणारी ही गाडी पहाटे ३ वाजता पोहोचली. यानंतर नियमित देखभाल, दुरुस्तीला वेळ झाला. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी वंदे भारत ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटली. यामुळे पुण्यात यायला दोन तास उशीर झाला. तर सीएसएमटी येथे १२:३५ ऐवजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी पोहोचली. यामुळे प्रवाशांना पुणे स्थानकावर दोन तास ‘वंदे भारत’ची वाट पाहत थांबावी लागली. परिणामी, प्रवाशांना मनस्ताप झाला.

 

Web Title : दिवाली विशेष ट्रेनों से वंदे भारत का समय बिगड़ा, हुई देरी

Web Summary : दिवाली विशेष ट्रेनों के कारण वंदे भारत की समय सारणी प्रभावित हुई है। सोलापुर-मुंबई वंदे भारत में चार घंटे तक की देरी हुई, जिससे पुणे स्टेशन पर यात्रियों को परेशानी हुई।

Web Title : Diwali Special Trains Disrupt Vande Bharat Schedule, Cause Delays

Web Summary : Diwali special trains are impacting Vande Bharat's punctuality. The Solapur-Mumbai Vande Bharat faced significant delays, up to four hours, causing passenger inconvenience at Pune station due to late arrivals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.