शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पुण्यात रंगला लोकमत 'स्वरचैतन्य' दिवाळी पहाटचा कार्यक्रम, रसिकांचा मिळाला भरभरुन प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 9:48 AM

मस्त गुलाबी थंडी... धुक्याची पसरलेली दुलई…. मनाला चैतन्यमयी करणाऱ्या स्वरांची मनसोक्त पखरण..सतारीच्या मंजूळ तारांनी हृदयाच्या छेडल्या गेलेल्या तारा... ओठातून उमटलेली ' वाह'ची दाद..

पुणे - मस्त गुलाबी थंडी... धुक्याची पसरलेली दुलई…. मनाला चैतन्यमयी करणाऱ्या स्वरांची मनसोक्त पखरण..सतारीच्या मंजूळ तारांनी हृदयाच्या छेडल्या गेलेल्या तारा... ओठातून उमटलेली ' वाह'ची दाद..अशा  प्रफुल्लित वातावरणात रसिकांची दिवाळी पहाट सप्तसुरामध्ये न्हायली. गायन आणि वादनाच्या सुरेल अविष्कारानी  रंगलेल्या मैफिलीने रसिकांचा पाडवा 'गोड ' झाला.  निमित्त होते युवराज ढमाले कॉर्पोरेशन प्रस्तुत लोकमत 'स्वरचैतन्य' दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. 

महालक्षमी लॉन्स येथे पहाटे 5.30 वाजता या स्वरमयी अविष्काराला रसिकांच्या उदंड प्रतिसादात प्रारंभ झाला. प्रसिद्ध युवा गायक राहुल देशपांडे यांच्या गानमैफिलीने स्वर चैतन्याची नांदी झाली. त्यांच्या स्वरांनी आसमंतात मांगल्याचे रंग भरले. 

'जाओ जाओ जगह जगह, लंगरवा पिअरवा सोने ना दे' ही बंदिश त्यांनी खुलवली. निखिल फाटक यांच्या तबला साथीला रसिकांनी दाद दिली. सजन आयो रे या बंदीशीबरोबर निर्गुण भजन सादर करून त्यांनी मैफिलीची सांगता केली. 

प्रसिद्ध सतारवादक  यांचे निलाद्री कुमार यांचे व्यासपीठावर आमगमन होताच रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली.सतारीच्या तारा हळुवारपणे छेडत त्यांनी मैफिलीचा ताबा घेतला. सतारीवर लीलया थिरकणा-या त्यांच्या बोटांची जादू रसिकांनी अनुभवली. त्यांच्या अद्वितीय अविष्काराने रसिकांची पहाट संस्मरणीय झाली.  

'लोकमत उपक्रम कायम सुरू ठेवावा'लोकमतने 'दिवाळी पहाट'चा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे तो पुढे कायम सुरू राहावा. कारण अशा कार्यक्रमांमुळे युवा कलाकारांना व्यासपीठ मिळते. "पुना मे एक बार कलाकार को हरी झंडी दिखती है तो आगे जाकर लाल झंडी दिखती नहीं है" - निलाद्री कुमार, आंतराराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017