शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

त्याने अमेरिका तर तिने जर्मनीमधून घेतला घटस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:43 IST

दोघांनाही मोठ्या पगाराची नोकरी... विशेष म्हणजे दोघेही दोनवेगवेगळ्या देशात नोकरीला... पण....

ठळक मुद्देदोघेही परदेशात नोकरीला : चारच महिने टिकला उच्चशिक्षित दाम्पत्याचा संसार

पुणे : ते दोघेही उच्च शिक्षित... दोघांनाही मोठ्या पगाराची नोकरी... विशेष म्हणजे दोघेही दोनवेगवेगळ्या देशात नोकरीला... पण वैचारिक मतभेदामुळे दोघांचे पटेनासे झाले आणि त्यांनी लग्न झाल्यापासून केवळ चार महिन्यांच्या आतच विभक्त होण्याचा निर्णय घेतले. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे साक्ष नोंदवून भारतात न येताच घटस्फोटही मंजूर केला.राजेश आणि रंजना (नावे बदललेली) असे य जोडप्याचे नाव.राजेश हा अमेरिकेमध्ये तर रंजना जर्मनीमध्ये नोकरी करते. या दोघांचे पुण्यात जुलै २०१६ मध्ये लग्न झाले. मात्र त्यांचे लग्नानंतर एकमेकांशी अजिबात पटले नाही. अबोला वाढल्याने ते चार महिन्यांतच वेगळे झाले. त्यानंतर नोकरीनिमित्त परदेशात गेलेल्या त्या दोघांनी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी नातेवाईकांना देऊन घटस्फोटाचा दावा दाखल केला. न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. अ‍ॅड. झाकीर मणियार यांची याप्रकरणातकोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर अ‍ॅड.प्रगती पाटील यांनी मीडीएटर म्हणून काम पाहिले. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. गणेश कवडे यांनी कामकाज पाहिले.पटेनासे झाल्यानंतर दोघेही वेगवेगळे राहू लागले. त्याच काळात ते नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक झाले. त्यामुळे दोघांनी भारतात येवून सुनावणीला हजर राहणे शक्य नव्हते. मात्र, कौटुंबिक न्यायालयात असलेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे परदेशातील पक्षकारांबरोबरही संवाद साधण्याच्या तंत्रज्ञानामुळे त्यांच्याबरोबर साक्ष नोंदविण्यात आली. त्यांची साक्ष नोंदविण्यासाठी न्यायालयाकडून अ‍ॅड. मणियार यांची याप्रकरणात कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी या दोघांची अमेरिकेत आणि जर्मनीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे साक्ष नोंदवून त्याचा अहवाल कोर्टाला सादर केला. न्यायालयाने त्यांचा परस्परसंमतीचा घटस्फोटाचा दावा मंजूर केला. तिला तीन लाख रुपयांची नुकसान भरपाई त्याने दिली. .................कागदपत्रांची होत तपासणी परदेशातून घटस्फोट घेणाऱ्या व्यक्तींना पूर्वी स्वत: न्यायालयात हजर राहावे लागत असे. परदेशात राहणाऱ्या व्यक्तींना तेथील राजदूतासमोर प्रतिज्ञापत्रे करून भारतीय न्यायालयात सादर करावी लागत असे. त्यामध्ये वेळेचा अपव्यय होत असे. मात्र न्यायालयातूनच थेट संबंधितांशी संपर्क साधला जाऊ शकतो. त्याची ओळख आणि कागदपत्रांची शहानिशा करून थेट संवाद साधला जातो. व्हिडीओ कॉन्फरसिंगची सुविधा परदेशातील पक्षकारांसाठी फायदेशीर ठरणारी आहे, असे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाGermanyजर्मनीCourtन्यायालयDivorceघटस्फोट