शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दिव्यांग मुलांनी चाखला आंब्यांचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 8:34 PM

सध्या उष्णतेच्या लाटेत शरीराची लाही लाही होत असताना पुणेकरांसाठी एक सुखावह आणि आनंदाची बाब म्हणजे आंब्यांचे इनकमिंग..

ठळक मुद्देदृष्टीहीन व विशेष मुलांसाठी आंबे खाणे स्पर्धा निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे मँगो मेनियाचे आयोजन

पुणे : सध्या उष्णतेच्या लाटेत शरीराची लाही लाही होत असताना पुणेकरांसाठी एक सुखावह आणि आनंदाची बाब  म्हणजे आंब्यांची घाऊ गर्दी. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हापूस आंब्याची चव चाखणे महागाईच्या काळात सामान्यांना अवघड झाले आहे.पण यासोबतच मनसोक्त आंबे खाण्याची मजा समाजातील वंचित विशेष मुलांना लुटता आली तर.. अशा मुलांना आंबे खाण्याचा आनंद मिळावा, यासाठी पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. मँगो मेनियामध्ये पिवळ्या धम्मक हापूस आंब्यांची मेजवानी घेत स्पर्श आणि चवीने पुण्यातील ३०० हून अधिक वंचित-विशेष मुलांनी आंब्याचा गोडवा चाखला. 

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे दिव्यांग आणि वंचित विशेष मुलांसाठी निरंजन मँगो मेनिया या आंबे खाणे स्पधेर्चे आयोजन करण्यात आले. यावेळी सीआयएएन हेल्थ केअरचे सुरज झंवर, अरिहंत जेनरिक ग्रुप वेलनेस इंडिया चे विपुल जैन, निरंजन सेवाभावी संस्थेचे धीरज भूत, स्वप्नील देवळे, जगदीश मुंदडा, डॉ. नवनीत मानधनी आदी उपस्थित होते. चिमुकल्यांना विविध भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे यंदा ९ वे वर्ष होते.    सुरज झंवर म्हणाले, आंबा हे लहान मुलांचे अतिशय आवडते फळ. आपल्या मुलांना हे फळ चाखण्याची संधी मिळते. परंतु विशेष मुलांना देखील आंबे खाण्याचा मनमुराद आनंद लुÞटता यावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबे खाण्याच्या आयोजित केलेल्या स्पधेर्चा उपक्रम कौतुकास्पद आहे.      विपुल जैन म्हणाले, विशेष मुलांना आंबे खाताना पाहण्याचा आनंद अवर्णनीय आहे. वंचित मुलांसाठी राबविलेला हा उपक्रम तर उत्तम आहेच, परंतु याबरोबर वृक्षसंवर्धनासाठी संस्थेने केलेले प्रयत्न देखील कौतुकास्पद आहेत.        आंबे खाणे स्पधेर्तील आंब्याच्या सुमारे २ हजार ५०० कोयी संस्थेचे कार्यकर्ते राजगड-वेल्हे आणि मुळशी परिसरात पेरणार असून वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. लोकमंगल फाऊंडेशन, धर्मवीर संभाजीराजे अनाथ आश्रम, नूतन समर्थ विद्यालय, पुणे अंध शाळा, माहेर फाऊंडेशन आदी संस्थेतील ३०० हून अधिक विशेष मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. .............* परदेशी पाहुण्यांनीही घेतला आंबे खाण्याचा आनंद निरंजन सेवाभावी संस्थेतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंबे खाणे स्पर्धेत विशेष वंचित मुलांबरोबर परदेशी पाहुण्यांनीही सहभाग घेत आंब्यांवर ताव मारला. इतरांप्रमाणेच पिवळ््याधम्मक, रसाळ आणि चविष्ठ आबांचा गोडवा चाखण्याचा मोह त्यांना देखील आवरला नाही. सामाजिक संस्थांचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटन, आॅस्ट्रेलिया वरून आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांनी  संस्थेतील मुलांशी संवाद साधत कार्यक्रमात सहभाग घेलता.   

टॅग्स :PuneपुणेMangoआंबा