शहराच्या रस्त्यांवरील कचरा पेट्यांची दोन महिन्यात दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 07:00 IST2019-05-30T07:00:00+5:302019-05-30T07:00:03+5:30

महापालिकेच्या वतीने आतापर्यंत सुमारे ४५ लाख रुपयांच्या कचरा पेट्या बसविल्या आहेत..

The disturbance of garbage bags in the city's streets for two months | शहराच्या रस्त्यांवरील कचरा पेट्यांची दोन महिन्यात दुरवस्था

शहराच्या रस्त्यांवरील कचरा पेट्यांची दोन महिन्यात दुरवस्था

ठळक मुद्देसर्व कचरा पेट्या व्हॉअर फ्लो; स्वच्छ सर्वेक्षण मोहीम कागदावर खाजगी कंपनीकडून तब्बल ९२५ ठिकाणी या लेटर बिन्स बसविण्यात आल्याएक कचरा पेटीचा खर्च तब्बल ४ हजार ३०० रुपये नव्याने तब्बल १ कोटी रुपयांचे टेंडर या कचरा पेट्यांसाठी काढण्यात येणार

- सुषमा नेहरकर-शिंदे 

पुणे : महापालिका प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करुन दोन-तीन महिन्यांपूर्वी शहराच्या विविध रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या बहुतेक कचरा पेट्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या सर्व कचरा पेट्या ओव्हर फ्लो झाल्या असून, तीन-चार दिवस या कचरा पेट्या रिकाम्या केला जात नाही. यामुळे सिंहगड रोड, फग्युर्सन रस्ता, डेक्कन, प्रभात रस्ता जागो-जागी कच-यांचे ढिग पडलेले दिसत आहे. महापालिकेने अत्यंत गाजावाजा करत पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु केले असले तरी, सध्या ही मोहीम कागदावरच असल्याचे लोकमतच्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.
    शहरातील रस्ते, फुटपाथ, चौकांमध्ये पडणारा कचरा कमी होण्यासाठी व नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व कमर्शिल रस्त्यांवर पन्नास-पन्नास मिटरच्या आत ओला-सुखा कच-यासाठी कचरा पेट्या (लेटर बिन्स) बसविण्यात आल्या आहेत. यामध्ये आता पर्यंत शहरामध्ये सुमारे १ हजार ९३५ ठिकाणी या लेटर बिन्स बसविम्यात आल्या आहेत. यात महापालिकेच्या वतीने ४७० ठिकाणी आणि आदर पुनावाला या खाजगी कंपनीकडून तब्बल ९२५ ठिकाणी या लेटर बिन्स बसविण्यात आल्या आहेत. अदार पुनावाला यांनी स्वखर्चाने या लेटर बिन्स बसविल्या आहेत. 
    दरम्यान महापालिकेच्या वतीने आतापर्यंत सुमारे ४५ लाख रुपयांच्या कचरा पेट्या बसविल्या आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, एक कचरा पेटीचा खर्च तब्बल ४ हजार ३०० रुपये करण्यात आला आहे.  आता नव्याने तब्बल १ कोटी रुपयांचे टेंडर या कचरा पेट्यांसाठी काढण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन बसविण्यात आलेल्या कचरा पेट्यांची मात्र दोन-तीन महिन्यात दुरवस्था झाली आहे. बहुतेक सर्व कचरा पेट्यांची झाकणे गायब झाली आहेत. अनेक ठिकाणी ओला-सुखा पैकी एकच कचरा पेटी शिल्लक असल्याचे लोकमतच्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.
--------------------------
कचरा पेट्या ओव्हर फ्लो
स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये शंभर टक्के घरांमध्ये जाऊन कचरा उचलण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये सध्या सुमारे ९० टक्के थेट घरांमधून कचरा उचलण्यात येत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु शहराच्या रस्त्यांवर किरकोळ कच-यासाठी बसविण्यात आलेल्या कचरा पेट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घतगुती कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच या कचरा पेट्या दररोज रिकाम्या करण्याची अपेक्षा असताना बहुतेक सर्व रस्त्यांवर तीन-चार दिवस या कचरा पेट्या रिकाम्या केल्या जात नाहीत. यामुळे अनेक रस्त्यांवर कचरा पेट्या व्हॉअर फ्लो होऊन फुटपाथवरच कच-याचे ढिग लागले आहेत.
-------------------------
- आता पर्यंत १३९५ कचरा पेट्या बसविण्यात आल्या
- यात आदर पुनावाला यांकडून ९२५ कचरा पेट्या मोफत
- महापालिका आणखी २ हजारप ७०० कचरा पेट्या बलविणार
- आता पर्यंत ४५ लाख रुपयांचा खर्च
- नव्याने एक कोटी रुपयांचे टेंडर काढणार

Web Title: The disturbance of garbage bags in the city's streets for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.