सैनिकी शाळेत जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धा
By Admin | Updated: January 23, 2017 02:27 IST2017-01-23T02:27:49+5:302017-01-23T02:27:49+5:30
जिल्हा परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्यस्पर्धा राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत उत्साहात पार पडल्या

सैनिकी शाळेत जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धा
पौड : जिल्हा परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्यस्पर्धा राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत उत्साहात पार पडल्या. या वर्षीचे आंतरशालेय नाट्यस्पर्धेचे संयोजक पद राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेकडे होते.
या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून ६५ संघांचा सहभाग अन् सुमारे १००० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेचा उंचावत जाणारा स्तर यावर्षीची उल्लेखनीय बाब होती.
अत्यंत उत्तम दर्जाची नाटके या स्पर्धेत सादर झाली. या स्पर्धेचे अत्यंत नेटके नियोजन राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने केले. स्पर्धेचे परीक्षण दोन स्तरांवर ६ मान्यवर व अनुभवी परीक्षकांनी केले.
या स्पर्धेचे हे ४७वे वर्ष असून लवकरच ही स्पर्धा सुवर्णमहोत्सव साजरा करणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली आहे. स्पर्धेसाठी संयोजन समितीचे कुबडे, भुतकर, खोत, घोरपडे, शिक्षणाधिकारी अत्तार, उपशिक्षणाधिकारी कारेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
संयोजक शाळेच्या वतीने प्राचार्य पूजा जोग यांच्या नेतृत्वाखाली नाट्यस्पर्धा विभाग प्रमुख महेश कोतकर, गजानन पाटील व पोपट कानगरे यांनी संयोजन केले, त्यांना सर्व शिक्षकवृंद, शाळेचा मेस विभाग व स्थावर व्ययस्थापन विभाग यांचे सहकार्य लाभले.(वार्ताहर)