शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वितरकांनो, दुचाकी खरेदीदारांना हेल्मेट द्या, अन्यथा कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 15:41 IST

- वितरकांनो हेल्मेट न दिल्यास होणार कारवाई

पुणे : दुचाकी वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. या निर्णयाची वितरकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असून हेल्मेट न दिल्यास संबंधित वाहन वितरकावर कारवाई केली जाणार आहे. शिवाय वितरकांकडून हेल्मेट देताना जास्तीचे पैसे आकारु नये, असा आदेश परिवहन विभागाकडून काढण्यात आला आहे.दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. यामध्ये दुचाकी चालकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दुचाकी वाहन खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीदाराला दोन हेल्मेट देण्याबाबत मोटर वाहन कायद्यामध्ये तरतूद करण्यात आले आहे. शिवाय वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कारवाई करण्याचीही तरतूद केली आहे. तसेच राज्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता न्यायालयानेदेखील याबाबत आदेश दिलेले आहेत.दुचाकीस्वाराला झालेल्या अपघातात बहुतांशवेळा डोक्यावर हेल्मेट नसल्याने जीव गमवावा लागतो. अशा प्रकारच्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे न्यायालयाने चिंता व्यक्त केली असून, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट सक्ती करण्याचे सूचित केलेले आहे. यामुळे राज्य परिवहन विभागाने खबरदारी घेत यापूर्वीच दुचाकी उत्पादक आणि विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच, याबाबत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना पत्राव्दारे कळविण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आता पुणे आरटीओ कार्यालयाने देखील याबाबत पत्र काढले असून सर्व वाहन वितरकांना आदेश दिले आहेत. त्यानुसार दुचाकी वाहन खरेदीदाराला दोन हेल्मेट द्यावे, असे यामध्ये म्हंटले आहे. विक्रेत्यांनी हेल्मेट न दिल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. तर विक्रेत्याचे ट्रेड सर्टिफिकेट रद्द केले जाईल...वाहन विक्रेत्याने दुचाकी खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्याला जास्तीची रक्कमदेखील आकारता येणार नाही. अशा पद्धतीने हेल्मेट न दिल्यास संबंधित विक्रेत्याचे ट्रेड सर्टिफिकेट रद्द केले जाईल, असे आरटीओकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकRto officeआरटीओ ऑफीसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस