शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीत कचऱ्यामुळे दुर्गंधी

By admin | Updated: June 17, 2015 22:43 IST

शिरोली (ता. खेड) गावच्या हद्दीबाहेर शेतात खत म्हणून टाकावयास आणलेल्या कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरल्यामुळे, नागरिकांना

कडूस : शिरोली (ता. खेड) गावच्या हद्दीबाहेर शेतात खत म्हणून टाकावयास आणलेल्या कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरल्यामुळे, नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, पावसाळ्यात या कचऱ्यावर पावसाचे पाणी पडून परिसरात दुर्गंधी व रोगराई निर्माण होण्याचा धोका आहे.कचऱ्यामुळे परिसरात कुत्र्यांसारखी अनेक भटकी जनावरे येत असून, सर्वत्र घाणीची दुर्गंधी पसरवीत आहेत. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर न कुजणाऱ्या वस्तूदेखील असून, रुग्णालयातील कचऱ्याचासुद्धा यात समावेश आहे. शिरोली येथील पोखरण वस्तीवर वाऱ्याबरोबर दुर्गंधी येऊ लागल्यामुळे शिरोलीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य पै.संजय सावंत, म.न.से.खेड तालुका उपाध्यक्ष मंगेश सावंत, धर्मेद्र पवळे, स्वप्निल पारघे, नवनाथ पवळे, सुधीर बेंढाले, रोहण शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांनी त्वरित कचऱ्याच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरण्याचा धोका असून त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी केली आहे. कचरा टाकणारे शेतकरी अरुण बबन वाळुंज यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली असता, शहरातून आणलेला हा कचरा आपल्या उसाच्या शेतात खत म्हणून वापरण्यासाठी आपण आणला असून, दिवाळीच्या वेळेस उसाच्या शेतात हा कुजलेला कचरा खत म्हणून टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरू नये, यासाठी या कचऱ्यावर जंतूनाशकांची फवारणी व पावडर टाकणार असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत शिरोलीच्या उपसरपंच सौ. सुनीता पवळे यांनी सांगितले की, हा कचरा शिरोलीच्या हद्दीत नसून या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास मात्र शिरोलीच्या नागरिकांना होत असल्यामुळे शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने शासन दरबारी या कचऱ्याच्या त्रासाबाबत कळविण्यात येणार असून, संबंधित शेतकऱ्यास शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांची अडचण कळविण्यात येणार आहे.