टोळक्याकडून दुकानदाराच्या घराची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 13:18 IST2018-05-02T13:18:33+5:302018-05-02T13:18:33+5:30

सिगारेट उशिरा दिल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दुकानदाराच्या घराची तोडफोड करत गल्ल्यातील रोकड पळविली.

Disruption of shopkeeper's house from the criminal gang | टोळक्याकडून दुकानदाराच्या घराची तोडफोड

टोळक्याकडून दुकानदाराच्या घराची तोडफोड

ठळक मुद्देफिर्यादींचा मुलगा आरोपींना समजावून सांगण्यासाठी गेला असता त्याला हात पाय तोडण्याची धमकी

पिंपरी : सिगारेट उशिरा दिल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दुकानदाराच्या घराची तोडफोड करत गल्ल्यातील रोकड पळविली. संदीप साहेबराव खैरनार (वय २३), जुबेर नासीर शेख (वय २१, दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेतील इतर चारजण फरार आहेत. मोहिनी अशोक भोसले (वय३६) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी निगडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांचा संघमित्र हाऊसिंग सोसायटी, ओटा स्कीम, निगडी, येथे गोळ्या बिस्कीट विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपींनी त्यांच्याकडे सिगारेट मागितली. ती उशिराने दिल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ केली. त्यावेळी मोहिनी यांचा मुलगा प्रशांत हा आरोपींना समजावून सांगण्यासाठी गेला असता, त्यास 'हातपाय तोडेल' अशी धमकी देऊन आरोपी घरात घुसले. घरातील दरवाजावर कोयत्याने मारून खिडकीच्या काचाही फोडल्या तसेच इतर वस्तूंची तोडफोड केली. दुकानाच्या गल्ल्यातील काही रक्कमही जबरदस्तीने चोरून नेली. 

Web Title: Disruption of shopkeeper's house from the criminal gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.