शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेे महापालिकेत चाललंय काय ? गटनेत्यांची भांडणे पोलिसात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 20:13 IST

राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात काय चालले आहे हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेत निवडून दिलेल्या गटनेत्यांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला असून राजकीय वादाला आता वेगळेच स्वरूप लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देश्रीनाथ भिमाले यांच्यावर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसचे पोलिसात पत्र भाजप गटनेत्याच्या विधानाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड एकवटले 

पुणे :  राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात काय चालले आहे हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेत निवडून दिलेल्या गटनेत्यांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला असून राजकीय वादाला आता वेगळेच स्वरूप लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

     सोमवारी झालेल्या महापालिकेतील सर्वसाधारण सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यात बाचाबाची बघायला मिळाली. यावेळी भीमाले यांनी रौद्ररूप धारण केले होते.त्यानंतर महापौर मुक्ता टिळक आणि इतर गटनेत्यांनी हस्तक्षेप केल्यावर हा वाद संपले असं वाटत असताना नवे वळण मिळाले आहे. शिंदे यांनी भाजप गटनेत्याने  माझी बदनामी केली असून त्यांच्यावर अब्रू नुकसानी केल्याबद्दलचा गुन्हा दाखल व्हावा असे पत्र शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिले आहे. त्यामुळे केवळ राजकीय आखाड्यात दिसणारे हे भांडण कायदेशीर लढाईत बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

       शिंदे यांना इतर पक्षांनीही साथ दिली असून मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी तर महापौरांना भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भिमाले यांच्या संदर्भात आलेल्या कटू अनुभवासह इतरही काही मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो. पण सभागृहनेत्यांची वागणूक कायम आम्हा गटनेत्यांसोबत वादाची राहिली आहे. जर आमचे काही चुकत असेल तर चुका दाखवा आम्ही माफी मागू असेही त्यांनी विनम्रपणे नमूद केले आहे.

      याशिवाय माजी महापौर अंकुश काकडे यांनीही या वादात उडी घेतली असून भिमाले यांच्या वागण्याचा निषेध केला आहे. त्यांनी महापौरांना लिहिलेल्या पत्रात सभागृह नेता हा सर्व सभासदांचा नेता असतो. मोठ्या भावाप्रमाणे त्याची वागणूक असायला हवी असे म्हटले आहे. या सभागृहात अनेक वाद-प्रतिवाद झाले आहेत, पण सोमवारचा वाद हा शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या सभागृहाची अप्रतिष्ठा करणारा आहे या शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

      संभाजी ब्रिगेड संघटनेनेही सभागृह नेत्याची असभ्य दादागिरी, सुसंस्कृत पुण्यात खपवून घेतली जाणार नाही या आशयाचे पत्र आयुक्तांना दिले आहे. शिंदे यांच्या विरोधात पुरावे नसतील तर भिमाले यांनी सभागृहाची माफी मागावी. असे झाले नाही तर त्यांच्या विरोधात महापौर आणि आयुक्तांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यात करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिस