.... म्हणून  मुख्यसभेत झाली दोन गटनेत्यांमध्ये बाचाबाची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 07:41 PM2018-05-21T19:41:15+5:302018-05-21T19:41:15+5:30

पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा नेहमीच विविध कारणांनी गाजत असते. कधी चित्रविचित्र आंदोलने तर कधी एखाद्या सभासदाची लक्षवेधी वेशभूषा यामुळे महापालिकेच्या सभेत अनेकदा हशाही पिकतो.

 In the General Assembly, there were two groups of leaders in the fight | .... म्हणून  मुख्यसभेत झाली दोन गटनेत्यांमध्ये बाचाबाची 

.... म्हणून  मुख्यसभेत झाली दोन गटनेत्यांमध्ये बाचाबाची 

googlenewsNext
ठळक मुद्देसभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गेटनेते अरविंद शिंदे यांच्यात बाचाबाची काँग्रेस गटनेता गरिबांचे पैसे खातो, सभागृह नेत्याचा गंभीर आरोप

पुणे :  पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा नेहमीच विविध कारणांनी गाजत असते. कधी चित्रविचित्र आंदोलने तर कधी एखाद्या सभासदाची लक्षवेधी वेशभूषा यामुळे महापालिकेच्या सभेत अनेकदा हशाही पिकतो. मात्र सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गेटनेते अरविंद शिंदे यांच्यात बाचाबाची बघायला मिळाली. 

 

      अतिक्रमण अधिकारी किशोर पाडळ यांना एक हॉटेलवर कारवाई केल्याच्या प्रकरणी महापालिकेत येवून मारहाण झाली होती. त्यावरून काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह काही सभासदांनी सवाल उपस्थित केला. अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे मतही काही सभासदांनी व्यक्त केले. ही चर्चा सुरु असताना  भिमाले यांनी पडाळे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून त्या अधिकाऱ्याची बाजू शिंदे का घेत आहेत,  असा प्रश्न उपस्थित करीत यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यास सुरुवात केली. काँग्रेस गटनेता अरविंद शिंदे हा एजंट आहे, हा गरिबांचे पैसे खातो, हा फ्रॉड माणूस आहेया अशा शब्दात भिमाले यांनी अरविंद शिंदे यांच्यावर आरोप केले. त्यावर अधिकाऱ्यांना केबिनमध्ये येऊन मारहाण करणे चुकीचे असून त्यांना संरक्षण मिळावे अशी भूमिका अरविंद शिंदे यांनी घेतली. यामुळे दोन्ही नेते भर  सभागृहाताच एकमेकांच्या विरोधात  भिडले.या  प्रकारामुळे सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ माजला. त्यामुळे अधिकाऱ्यांना खुलासा करणे अवघड झाले. भरीसभर म्हणून भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवकही एकमेकांसमोर आल्यामुळे सभागृहात गोंधळ अधिक वाढला. अखेर महापौर आणि इतर गटनेत्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. 

Web Title:  In the General Assembly, there were two groups of leaders in the fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.