शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा तर होणार! मुंबईत चंद्रकांत पाटील अन् राज ठाकरे यांच्यात चर्चा; पुण्यात सायंकाळी मनसेची तातडीची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 20:36 IST

चर्चा तर होणारच! मुंबईत सकाळी चंद्रकांत पाटील अन् राज ठाकरे यांच्यात चर्चा; सायंकाळी मनसेची पुण्यात तातडीची बैठक 

पुणे : भाजप आणि मनसे युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दोन्हीही पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींमध्ये यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहे. मात्र राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड शुक्रवारी सकाळी मुंबईत घडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांची भेट घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा भाजप मनसे युतीचे जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. याच दरम्यान राज ठाकरे यांनी तातडीने पुण्यात पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली असल्याची माहिती आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा झाली नसती तरच नवल होते. परंतू, ही केवळ सदिच्छा भेट होती असे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सांगितले असले तरी यामध्ये राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती आहे. पण भाजप आणि मनसे युतीबाबत असा कोणताही प्रस्ताव सध्यातरी नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

राज ठाकरेंचा एका महिन्याच्या कालावधीत तिसरा पुणे दौरा...  राज ठाकरे यांनी आगामी काळातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.गेल्या महिन्याभराच्या कालावधीत राज ठाकरे यांनी आज तिसऱ्यांदा पुणे गाठले आहे. मागील दोन बैठकांत त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला होता.या दौऱ्यात सुद्धा ते ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांचाही त्यात समावेश असणार आहे. पुण्यात सायंकाळी ही बैठक बोलवण्यात आली होती. 

...अन् राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले, 'मी काय कुंद्रा आहे का?'राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाल्यानंतर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटोज, व्हिडीओ घेण्यासाठी गर्दी केली होती. बराचवेळ फोटोग्राफर फोटोज क्लिक करत होते, हे पाहून राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. फोटोग्राफर्सकडे पाहून राज ठाकरेंनी हसत म्हटलं, सर्व आलं का कान.. नाक? किती वेळा तेच तेच, असं म्हणत 'मी काय कुंद्रा आहे का?', असं  मिश्किल भाष्य राज ठाकरे यांनी केलं होतं.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMNSमनसेPoliticsराजकारण