शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सीजीएचएस व हॉस्पिटलच्या मनमानीचा जेष्ठ नागरिक रूग्ण व नातेवाईकांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 2:03 PM

पुणे शहरात लाखो जेष्ठ नागरिक योजनेचे लाखाहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय लाभधारक आहेत...

ठळक मुद्देनियमांचे कारण देत रूग्णांची हेळसांड नऊ दवाखान्यासह मुकुंदनगर येथील मुख्य रूग्णालयात तपासणी व उपचार सीजीएचएस कडून रूग्णालयांना काही अटी व नियम शहरातील लाखो जेष्ठ नागरिकांच्या उपचारासाठीची केंद्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा बोजवारा

पुणे : केंद्र शासनाच्या सेवानिवृत्तासांठीच्या सीजीएचएस वैद्यकीय योजनेचा रूग्णालय व सीजीएचएस कार्यालयाच्या समन्वयाच्या अभावामुळे जेष्ठ नागरिक रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. सीजीएचएसची नियमावली राबवताना रूग्णालयांकडून जेष्ठ नागरिक रूग्णांची हेळसांड सुरू आहे. पुणे शहरात लाखो जेष्ठ नागरिक योजनेचे लाखाहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय लाभधारक आहेत. मात्र सीजीएचएस दवाखान्यात देखील योग्य सोयी सुविधा व उपचार उपलब्ध नाहीत. या गंभीर समस्येमुळे जेष्ठ नागरिक व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.     शहरात सीजीएचएस योजनेचे लाखाहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय लाभधारक आहेत. नऊ दवाखान्यासह मुकुंदनगर येथील मुख्य रूग्णालयात तपासणी व उपचार दिले जातात. शहरातील काही रूग्णालयात रूग्णांसाठी उपचार,तपासणी व शस्रक्रिया हे सीजीएचएसच्या नियमावली प्रमाणे देण्यात येतात. अनेक रूग्णालयांची बीले सीजीएचएस कडून वेळेवर दिली जात नाहीत अशी रूग्णालयांची तक्रार आहे. त्यामुळे शहरातील अनेक मोठ्या रूग्णालयांनी सीजीएचएस लाभधारक जेष्ठ नागरिकांच्या उपचारासाठी त्यांचे दरवाजे बंद केले आहेत. तातडीच्या उपचारासाठीची नियमावली राबवताना सीजीएचएस कडून रूग्णालयांना काही अटी व नियम ठरवून दिले आहेत. रूग्णाची तातडीचे उपचार व त्यासाठी आवश्यक रक्कम मंजूर करण्यासाठी सीजीएचएसच्या वतीने वेगळी संस्था काम करते. त्यांच्या जाचक अटींमुळे गरजू रूग्णांना देखील कधीकधी योग्य उपचार मिळत नाहीत.

रविवारी (दि.20) रोजी एक जेष्ठ नागरिक महिला उच्च रक्तदाब व इतर त्रासांसाठी इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल येथे अ‍ॅडमीट होण्यासाठी गेल्या होत्या. हा आजार तातडीच्या उपचारात बसत नसल्यामुळे अ‍ॅडमीट करता येणार नाही असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र रूग्णाला होणारा त्रास लक्षात घेऊन नातेवाईकांनी अ‍ॅडव्हान्स पैसे भरून उपचारासाठी दाखल केले.दुसऱ्या दिवशी मतदानामुळे सीजीएचएस कार्यालयाला सुट्टी होती. बुधवारी रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्या संबंधित सीजीएचएस दवाखान्यात रितसर मेमोची मागणी केली. यावर सीजीएचएसच्या नियमांचे पालन करून रूग्णावर पुढिल उपचार करावेत असे पत्र इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलला देण्यात आले. मेमो आवश्यक असताना नियमात अ‍ॅडमीट करून घेण्याचे पत्र इनलॅक्स प्रशासनाने स्विकारले नाही.उलट उपचार सुरू असणार्या जेष्ठ नागरिक महिला रूग्णाला त्वरित डिस्चार्ज देण्यात आला.हॉस्पिटल प्रशासन व सीजीएचएसच्या समन्वयाच्या अभावामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना याचा भयंकर मनस्ताप सहन करावा लागला. नाईलास्तव नातेवाईकांनी याबाबत कोरेगाव पार्क पोलिसांकडे याबद्दल तक्रार दिली. त्यानंतर डिस्चार्ज रद्द करून पुढील उपचार सुरू करण्यात आले. सीजीएचएस व हॉस्पिटलच्या मनमानी चा हा गंभीर प्रकार पोलिसांच्या मध्यस्थीने सुटला. मात्र रूग्णालय व सीजीएचएस यांच्या कडून याबाबत नेमकी जबाबदारी कोणाची यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते. शहरातील लाखो जेष्ठ नागरिकांच्या उपचारासाठीची केंद्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा बोजवारा उडालेला आहे. मात्र त्याची कोणीही गांभीर्याने दखल घेत नाही. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सीजीएचएस लाभधारक जेष्ठ नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल