शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

असुविधांचा पाढा, प्रशासन धारेवर; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून तीव्र भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 04:50 IST

महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनीदेखील कामे होत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली.

पुणे : शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडलाय, भर पावसाळ्यात अनेक भागाला आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही, रस्त्यांची चाळण झाली, ड्रेनेजची कामे होत नाहीत, शाळांची दुरवस्था झाली, ढासळलेली आरोग्य सेवा आदी प्रश्नांचा पाढांच सदस्यांनी वाचला. अधिकारी नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत, लेखी अर्जांना उत्तर दिले जात नाही, सत्ताधाºयांचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही, असे सांगत गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनीदेखील कामे होत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली.महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिकेची मुख्य सर्वसाधारण सभा झाली. यावेळी सभेची सुरुवातीलाच पॉइंट आॅफ इन्फॉर्मेशनमध्ये काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी ई-बसेस खरेदीचा निर्णय महापालिका आयुक्त कसे जाहीर करतात,हा महापौर आणि सभागृहाचा अवमान आहे.महापालिकेच्या बोगस कारभारामुळे विजेचा झटका लागून एका मुलाचा जीव जातो तरी प्रशासन जागे होत नाही, शहराच्या कानाकोपºयातून आपल्या भागातील प्रश्न घेऊन सदस्य अधिकाºयांकडे जातात, पण अधिकारी कार्यालयात भेटतच नाहीत, असा आरोप करत खुलासा करण्याची मागणी करत चर्चा सुरू केली. त्यानंतर सत्ताधारी भाजपाचे सदस्य सुशील मेंगडे, कर्णे गुरुजी, माधुरी सहस्रबुद्धे, मंजूषा खर्डेकर, छाया मारणे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी सत्ताधारी सदस्यासह संजय भोसले, अविनाश बागवे, बाळा ओत्सवाल, योगेश ससाणे, गफुर पठाण आदी विरोधी सदस्यांनी एलईडी दिवे, वाहतूक, खड्डे, पाणी पुरवठा, आरोग्य अशा विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरायला सुरुवात केली.सत्ताधारी सदस्यांकडून हतबलता व्यक्त केली जात असताना विरोधकांकडून या परिस्थितीला भाजपाचे पदाधिकारीच जबाबदार असल्याचे सांगत सत्ताधाºयांचा प्रशासनावर अंकुश राहिला नसल्याचे सांगितले. बहुमतामुळे सत्ताधारी विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही, प्रश्न-उत्तराचा तास घेतला जात नाही, यामुळे प्रशासनावर दबाव राहत नसल्याचा आरोप अविनाश बागवे यांनी केला.अधिकाºयांची चुगली पडली प्रशासनालाच महागातसर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्व अधिकाºयांनी सर्वसाधारण सभेस उपस्थित राहावे. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे द्या. यासाठी घाबरायचे कारण नाही, अशा सूचना अधिकाºयांना दिल्या. परंतु, बैठक झाल्यानंतर एका अधिकाºयाने ही बाब सत्ताधारी भाजपाच्या एका पदाधिकाºयाच्या कानात सांगितली. पदाधिकाºयांचे यापुढे आयुक्त ऐकणार नसल्याचेदेखील सांगितले अन् इथेच माशी शिंकली आणि सर्वसाधारण सभेत आयुक्त आणि अधिकाºयांना धारेवर धरण्याची रणनीती आखली गेल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात होती.महापालिकेचे हित लक्षात घेऊनच काममहापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनावर जोरदार टीका झाल्यानंतर खुलासा करताना महापौर सौरभ राव यांनी थोडे भावनिक होत आपण अत्यंत लो प्रोफाईल अधिकारी असून, महापालिकेचे हित लक्षात घेऊनच व कायद्यात बसणारीच कामे करणार असल्याचे स्पष्ट केले.सध्या अधिकारी, कर्मचाºयांची कमतरता असल्याने अनेक अडचणी येत असून, शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर रिक्त भरण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. तसेच शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वय साधून काम करावे, अशी अपेक्षादेखील व्यक्त केली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे