शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत विसंवाद, मतभेद चव्हाट्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 09:55 IST

जागा काँग्रेसची, दावा केला राष्ट्रवादी काँग्रेसने

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता खुद्द अजित पवार यांनीच दावा केला आहे. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे असूनही पवार यांनी त्यावर राष्ट्रवादीचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. यामुळे पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

टिंबर मार्केट येथे गुरुवारी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार सकाळीच पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी पोटनिवडणूक जाहीर होणार असल्याची माहिती असल्याचे सांगितले.  ते म्हणाले, आता लोकसभेची मुदत संपण्यात फक्त वर्षाचा कालावधी बाकी असल्याने पोटनिवडणूक घेणार नाहीत, असे वाटत होते, मात्र पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असे दिसते.

सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की, प्रत्येक पोटनिवडणूक किंवा निवडणूक विरोधकांनी जिंकायला हवी. पुणे शहरात आमची राजकीय ताकद जास्त आहे.  आमचे ४० पेक्षा जास्त नगरसेवक होते, तर काँग्रेसचे फक्त १०. अशा स्थितीत ही जागा हातची का घालवायची? असा विचार आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी असे आमचे म्हणणे असल्याचे पवार यांनी सांगितले. जिथे ज्यांची ताकद जास्त ती जागा त्यांनी लढवावी, असे साधे सूत्र आहे असेही ते म्हणाले.

पोटनिवडणुकीची तयारी पूर्णजिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने पोटनिवडणुकीची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. मतदान यंत्रांपासून सर्व सज्जता प्रशासनाची आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान यंत्रांची तपासणी अशी सर्व कामे झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

राजकीय ताकद कोणाची जास्त हे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिसून आले आहे. अजित पवार काय म्हणाले? ते माहिती नाही, मात्र पुणे शहर लोकसभेच्या जागेवर आम्ही कोणाचाच दावा मान्य करणार नाही. ही जागा काँग्रेसचीच व पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर ती काँग्रेसच लढवेल. यातून मविआत पुण्यामध्ये काहीही मतभेद वगैरे  होणार नाहीत.    मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसgirish bapatगिरीश बापट