शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील घरफोडीचे थेट विदर्भ कनेक्शन; महाराष्ट्र, कर्नाटकातील १९ गुन्हे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 19:16 IST

महाराष्ट्रासह कर्नाटकातील १९ गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बारामती: सांगवी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा शोध घेण्यात पुणे जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.  घरफोडी प्रकरणी नागपूर शहरातुन दाम्पत्याला सापळा रचून अटक केली. या दाम्पत्याने राज्यासह कर्नाटकात धुमाकूळ घातल्याचे पोलीस तपासात उघड झाली आहे. तब्बल १९ गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी नवनीत मधुकर नाईक (वय ४०) व प्रिया नवनीत नाईक (वय ३६, रा. विजय निवास, रेडीस चाळ, शिवाजीनगर, भांडूप पश्चिम मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सांगवीमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणी २ डिसेंबर रोजी राहुल सदाशिव तावरे यांनी याबाबत फिर्याद दिली होती

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथे झालेल्या घरफोडीत ३ लाख ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. त्यानंतर तातडीने या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या पथकाने सुरु केला होता.पोलीस तपासात  या गुन्ह्यातील आरोपी नागपूर येथे भाडोत्री राहत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. या पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांनी सांगवीतील गुन्ह्याची कबुली दिली. 

या पती-पत्नी विरोधात राज्यासह कर्नाटकात तब्बल १९ चोरीचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. भोर, लोणावळा, कोपरगाव (नगर), पोयनाड (रायगड), मोरा सागरी (नवी मुंबई), लोणंद, बडनेरा(अमरावती), पेठवडगाव (कोल्हापूर), शहापूर (ठाणे), रत्नागिरी, छावणी (नाशिक), कारंजा (वाशिम), मिरज (सांगली), सदर बझार (जालना), वाशी (नवी मुंबई), रबाळे (नवी मुंबई), के. आर. पूरम (बेंगलोर) या ठिकाणी १९ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनवट यांच्यासह उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, कर्मचारी दत्तात्रय गिरीमकर, रविराज कोकरे, अनिल काळे, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, ज्योती बांबळे, महमंद मोमीन, विजय कांचन, अजित भुजबळ, अभिजित एकशिंगे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, डी. बी. डमरे यांनी घरफोडी करणाºया दांपत्याला गजाआड करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

टॅग्स :BaramatiबारामतीtheftचोरीThiefचोरPoliceपोलिसArrestअटक