शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरच्या मुथाळणे गावात भीषण परिस्थिती; आदिवासी बांधव गढूळ पाणी पितायेत गाळून, १५ दिवसात पाण्याचा टँकरच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:11 IST

आदिवासी माता भगिनींचा जीव आता पाणी मिळविण्यासाठी मेटाकुटीला आला

अशोक खरात 

खोडद : जुन्नर तालुक्यातील मुथाळणे गावच्या गावठाणवाडीत मागील १५ दिवसांपासून पाण्याचा टॅंकर आला नाही. यामुळे या आदिवासी माता भगिनींचा जीव आता पाणी मिळविण्यासाठी मेटाकुटीला आला आहे. खडकाच्या झिऱ्यातून येणारे थेंब थेंब पाणी वाटी वाटीने भरून घ्यायचे आणि  हंडा भरायचा अशी कसरत या महिलांना करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी या ग्रामस्थांना रात्रभर ताटकळत राहावे लागत आहे.

या गावठाणवाडीत सुमारे १५ दिवसांपूर्वी पाण्याचा टॅंकर आला होता पण त्यानंतर पुन्हा आजपर्यंत टॅंकर आला नसल्याने येथील आदिवासी बांधवांचे अतोनात हाल झाले आहेत. या आदिवासी बांधवांना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न आता व्यक्त केला जात आहे. या गावठाणवाडी मध्ये सुमारे ३५ कुटुंब वास्तव्य करत आहेत. पाणी मिळविण्यासाठी खडकातून येणाऱ्या झिऱ्याचा वापर केला जातो. राहत्या घरापासून सुमारे एक किलोमीटर भर पायपीट करून या ठिकाणी येऊन वाटी वाटी भरून पाणी घेतले जाते. हे पाणी मिळविण्यासाठी पहाटे ३ वा.नंबर लावले जातात तर काही जण रात्रभर या ठिकाणी झोपायलाच येतात. रात्रीच्या वेळी या ठिकाणी पाण्यासाठी नंबर लावायचा आणि जवळच शेकोटी करून तिथेच झोपायचं आणि नंबर आला की पाणी मिळवायचं असा हा या ग्रामस्थांचा जणू दिनक्रमच झाला आहे. पहाटे ३ वा.जर पाणी भरण्यासाठी नंबर लावल्यानंतर दुपारी २ ते अडीचच्या दरम्यान नंबर येतो अशी परिस्थिती आहे. कधी कधी पाण्यासाठी लावलेल्या नंबर वरून महिलांची भांडणं देखील होतात.

मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी 

मुथाळणे , कोपरे , मांडवे , जोशीची वाडी , पुताची वाडी या परिसरातील तरुण मुलं नोकरीनिमित्त पुणे , मुंबई ,नाशिक यासारख्या ठिकाणी बाहेर गावी स्थायिक आहेत. घरी वयोवृद्ध आई वडील असतात. त्यांना विशेषतः पाण्यासाठी या उतरत्या वयात पाण्यासाठी पायपीट करावी लागते. ज्या वयात आराम करण्याची गरज आहे. त्या वयात पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष म्हणजे खेदजनक आणि दुर्दैवी आहे.

पाण्यासाठी संघर्ष अत्यंत खेदजनक बाब 

या भागात दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवते पण या समस्येवर शाश्वत उपाययोजना न करता पाण्याचा टॅंकर देऊन तात्पुरत्या स्वरूपात ही समस्या सोडवली जाते.मागील अनेक वर्षांपासून म्हन्हे अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासून या भागातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी दरवर्षी संघर्ष करावा लागत आहे ही खेदजनक बाब आहे.

गढूळ व शेवाळ आलेलं पाणी गाळून पितात 

पाणी ही मूलभूत गरज व हक्क आहे, तरी देखील जुन्नर तालुक्यातील  या दुर्गम भागातील अनेक आदिवासी बांधवांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. एकीकडे आपण फिल्टर आणि बाटली मधलं पाणी पितो आणि एकीकडे हे लोक गढूळ व शेवाळ आलेलं पाणी गाळून पितात , हा विरोधाभास आणखी किती दिवस पाहायला मिळणार आहे ? हा मन विषण्ण करणारा प्रश्न आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरWaterपाणीRainपाऊसGovernmentसरकार