शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप खेडकर पुन्हा अडचणीत; तहसीलदाराने दिली २ पानांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:35 IST

तहसीलदार दिलीप आकडे यांनी कामात अडथळा आणला असल्याचा तक्रार अर्ज बंड गार्डन पोलिसांकडे दिला आहे

पुणे : वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हीचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडे कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार नाेंदवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार दिलीप आकडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात २ पानी तक्रार अर्ज दिल्यामुळे दिलीप खेडकर पुन्हा अडचणीत येणार आहेत. पुणे पोलिसांकडून या अर्जाची चौकशी सुरू केली असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

आयएएस प्रशिक्षणार्थी म्हणून पूजा खेडकर हिची पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती. यादरम्यान तिने स्वतंत्र केबिन, शिपायांची मागणी केली, तसेच खासगी गाडीवर अंबर दिवा लावल्याने ती वादग्रस्त ठरली. पूजासह तिच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पूजाला सुविधा द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला होता. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी शासनाला एक अहवाल सादर केला होता. त्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन, शिपाई किंवा इतर गोष्टी नसतात. मात्र, पूजा खेडकर हिने यासाठी आग्रह धरला होता.

दरम्यान, याप्रकरणी तहसीलदार दिलीप आकडे यांनी कामात अडथळा आणला असल्याचा तक्रार अर्ज बंड गार्डन पोलिसांकडे दिला आहे. त्या अर्जाची चौकशी सुरू केली असून, संबंधित तहसीलदारांना जबाबासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ते आज येऊ शकले नाहीत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेias pooja khedkarपूजा खेडकरGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणupscकेंद्रीय लोकसेवा आयोग