शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

डिजिटल डोअर नंबरची निविदा अखेर केली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 04:18 IST

शहरातील मिळकतींवर स्मार्ट डिजिटल डोअर नंबर टाकण्याच्या कामाची १० कोटी रुपयांची निविदा महापालिका आयुक्तांनी अखेर रद्द केली.

पुणे : शहरातील मिळकतींवर स्मार्ट डिजिटल डोअर नंबर टाकण्याच्या कामाची १० कोटी रुपयांची निविदा महापालिका आयुक्तांनी अखेर रद्द केली. निविदा प्रक्रिया राबविताना कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नसल्याचा ठपका आयुक्त; तसेच अतिरिक्त आयुक्तांनी खात्यावर ठेवला आहे.महापालिकेच्या कर संकलन विभागाने ही निविदा जाहीर केली होती. यात शहरातील प्रत्येक मिळकतीवर क्रमांक टाकण्यात येणार होता. त्या क्रमांकामुळे त्या मिळकतीचे मोजमाप, मालकाचे नाव, कर किती, कधी जमा केला वगैरे माहिती मिळणार होती. अशाच प्रकारचे काम कर संकलन विभागाने यापूर्वी दिले होते. त्या कामाचे काय झाले, ते झाले किंवा नाही याची माहिती न घेता; तसेच महापालिका आयुक्तांची नियमानुसार परवानगी न घेता, ही निविदा प्रक्रिया राबवली गेली असल्याचा ठपका आयुक्तांनी ठेवला आहे.जीआयएस सर्व्हे अशा नावाने महापालिकेने शहरातील मिळकतींना संगणकीय टॅग लावण्याचे काम दोन कंपन्यांना दिले होते. त्यांनीच हे काम करणे अपेक्षित असताना ते केले नाही. त्याची काहीही चौकशी ही निविदा नव्याने जाहीर करताना केली गेलेली दिसत नाही असे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त कार्यालयाचे म्हणणे आहे. त्यांनी त्या संबंधात मिळकत कर विभागाकडे खुलासाही मागितला होता. खात्याने खुलासा करताना सर्व माहिती देत नव्याने निविदा मागवण्याचे समर्थन केले. आयुक्त कार्यालयाने मात्र हा खुलासा संपूर्ण अमान्य केला आहे; शिवाय त्यावर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. खात्याकडे अशा प्रकारच्या डिजिटल नंबरची माहिती घेण्यासाठीचे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नाही, तरीही निविदा प्रक्रिया जारी का करण्यात आली अशी विचारणा त्यांनी खात्याकडे केली आहे. जुन्या ठेकेदाराने काम केले नाही, तर त्याच्यावर काय कारवाई केली, याचीही माहिती खात्याने दिलेली नाही याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.सजग नागरिक मंचाने आयुक्त व अतिरिक्त आयुक्त कार्यालयाच्या निविदा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल स्वागत केले आहे. नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी यातून थांबली आहे असे त्यांनी म्हटले आहे.क्रमांकासाठी १० कोटींची गरज नाही४मिळकतींवर क्रमांक टाकणे खात्याला आवश्यक वाटत असल्यास त्यासाठी अशी १० कोटी रुपयांची निविदा काढण्याची गरज नाही. पुणे शहरात खासगी आयटी कंपन्यांची संख्या कितीतरी मोठी आहे. त्यांना एखाद्या वर्षात करामध्ये सवलत देऊन वा सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व) अंतर्गत त्यांच्याकडून अशी सेवा घेणे सहज शक्य आहे असेही आयुक्त व अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणे