शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी बेराेजगार शिक्षकांचे उपाेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:14 IST

डी.टी.एड, बी.एड. स्टुडंट असाेसिएशच्यावतीने विविध मागण्यांसाठी शिक्षक अायुक्त कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपाेषण करण्यात येत अाहे.

पुणे : शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम त्वरीत जाहीर करुन प्राथमिक ते उच्च माध्यमिक 24 हजारांहून अधिक शिक्षकांची रिक्त पदे स्थानिक भरतीस प्राधान्य न देता अभियाेग्यता चाचणीच्या गुणानुक्रमे केंद्रीय पद्धतीने एकाच टप्प्यात तात्काळ भरती करावी, बिंदुनामावलीच्या अनियमिततेच्या राज्यस्तरीय चाैकशी करुन कुठल्याही प्रवर्गावर अन्याय नहाेता त्यानंतरच शिक्षक भरती करावी या व इतर प्रमुख मागण्यांसाठी डी.टी.एड, बी. एड. स्टुडंट असाेसिएशनच्या वतीने शिक्षण अायुक्त कार्यालयाबाहेर उपाेषण करण्यात येत अाहे. राज्यभरातील शेकडाे बेराेजगार शिक्षक या उपाेषणात सहभागी झाले अाहेत. 

    डी.टी.एड, बी.एड. स्टुडंट असाेसिएशनच्या वतीने विविध मागण्या करण्यात अाल्या अाहेत. त्यात 24 हजाराहून अधिक शिक्षकांची रिक्त पदे स्थानिक भरतीस प्राधान्य न देता अभियाेग्यता चाचणीच्या गुणानुक्रमे केंद्रीय पद्धतीने एकाच टप्प्यात तात्काळ भरती करावी, बिंदुनामावलीचीच्या अनियमिततेची राज्यस्तरीय चाैकशी करुन त्यानंतरच शिक्षक भरती करावी, 7600 बाेगस अपात्र शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे तसेच दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सन 17-18 ची माध्यमिक विभागाची संच मान्यता शासनाने त्वरित जाहीर करावी, खाजगी अनुदानिक संस्ता अधिनियमात बदल करुन कायद्यात रुपांतरीत करावे व खाजगी व्यवस्थापनाच्या शैक्षणिक संस्थामधील नाेकरभरती शासनाने करावी अादी प्रमुख मागण्या या संघटनेकडून करण्यात येत अाहेत. 

    याबाबत बाेलताना या संघटनेचे अध्यक्ष संताेष मगर म्हणाले, बिंदुनामवली सह 24 हजार शिक्षकांची भरती येत्या एक महिन्यात व्हावी, बेकायदेशीर शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे अादी मागण्यांसाठी अाम्ही अाज जमलाे अाहाेत. अामच्या मागण्यांबाबात शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास अाम्ही अामच्या उपाेषणाची धार अाणखी वाढवू. तसेच महाराष्ट्रभर अाक्रमक अांदाेलने करु.    या संघटनेचे उपाध्यक्ष परमेश्वर इंगाेले पाटील म्हणाले, राज्यभरातले बेराेजगार शिक्षक या ठिकाणी अाज उपाेषणासाठी जमा झाले अाहेत. शासनाने तात्काळ अामच्या मागण्यांची दखल घ्यावी. अामच्या मागण्या मान्य करुन अामच्या जीवित्वाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र