शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आळेफाटा येथील सोसायटीत होतेय टँकरमधून डिझेलची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:48 IST

- आळेफाटा परिसरात राजरोसपणे डिझेलची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.

आळेफाटा : पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठलेला असताना आळेफाटा येथे एका सोसायटीच्या आवारात गुरुवारी (१२ जून) रात्री जीओ लोगो असलेल्या डिझेलचे टँकर व एचपी लोगो असलेला कंत्राटदाराचा छोटा टँकर एकमेकांत डिझेल बदली करून भरीत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. आळेफाटा परिसरात राजरोसपणे डिझेलची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.

याप्रकणी पुरवठा विभाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करीत आळेफाटा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे वापरण्यास बंदी असलेले केमिकलयुक्त डिझेल किंवा बायोडिझेल असल्याची चर्चा आहे. अवघ्या ७८ रुपये प्रतिलिटर दराने हे डिझेल ठेकेदार आणि ट्रकचालकांना विकले जात आहे. या तस्करीमुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून, आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत डिझेल तस्करीचे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

आळेफाटा परिसरातील नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या सिद्धिविनायक सोसायटीतील पार्किंगमध्ये तस्कर जीओ व एचपी लोगो असलेल्या एका डिझेल टँकरमधून दुसऱ्या डिझेल टँकरमध्ये डिझेल भरत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गुरुवारी व्हायरल झाला. त्यानंतर आळेफाटा पोलिसांना याबाबत स्थानिकांनी माहिती दिली. संबंधित आरोपी यांनी ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थ निवासस्थानी ठेवण्यास प्रतिबंध असताना देखील अंदाजे पन्नास लिटर डिझेलची साठवणूक त्यांचे निवासस्थानातील स्टोअर रूममध्ये साठवून ठेवल्याचे पोलिस तपासात निदर्शनास आले आहे. त्यानुसार त्यांनी जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ नुसार येत असलेल्या मोटार स्पिरीट/ हाय स्पीड डिझेल नियंत्रण आदेश २००५ यातील तरतुदीचे तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ७ चे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

दरम्यान, पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती माधुरी बबनराव संतोषवार यांनी अधिकची चौकशी करत राजेंद्र श्रीपत कुऱ्हाडे (वय ६०, रा. सिद्धिविनायक सोसायटी, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्याविरुद्ध जीवनावश्क वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ प्रमाणे शुक्रवार (१४ जून) रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी