शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीचा पीएमपीला भुर्दंड, महिनाभरात सव्वा सहा रुपये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 01:42 IST

महिनाभरात सव्वा सहा रुपये वाढ : दैनंदिन खर्चात अडीच लाखांची भर

पुणे : दररोजचा खर्च भागवता भागवता नाकीनऊ येत असताना, पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) डिझेल दरवाढीने जेरीस आणले आहे. मागील महिनाभरात डिझेलच्या दरात सव्वा सहा रुपयांची वाढ झाल्याने इंधनाचा दैनंदिन खर्च अडीच लाख रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे पीएमपीला खर्च भागवताना मोठी कसरत करावी लागत असल्याची स्थिती आहे. दररोज वाढणारे इंधन दर आता पीएमपीला परवडणारे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ८०० बस डिझेलवर चालणाºया आहेत, तर जवळपास ६०० बस सीएनजीवर धावतात. आॅगस्ट महिन्यानंतर सीएनजीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, डिझेल दरवाढीचा फटका पीएमपीला बसत आहे. डिझेलवरील बसला दररोज सुमारे ४० हजार लिटरची गरज असते. पीएमपीला काहीशा कमी दराने इंधन कंपनीकडून डिझेलचा पुरवठा होतो. सोमवारी (दि. १) हा दर प्रति लिटर ७५ रुपये होता. या दरानुसार पीएमपीचा डिझेलवरील दैनंदिन खर्च ३० लाखांवर गेला आहे. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पीएमपीला ६८.७५ रुपये प्रतिलिटर दराने डिझेल उपलब्ध होत होते. महिनाभरात सव्वा सहा रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर अखेरपर्यंत दैनंदिन खर्चात अडीच लाख रुपयांची भर पडली आहे.इंधन कंपनीकडून पीएमपीसाठी दर पंधरा दिवसांनी दर निश्चित केले जातात. त्यानुसार ३१ आॅगस्टला ६८.७५ रुपये हा दर होता. त्यामध्ये दि. १ सप्टेंबर रोजी १ रुपये ६० पैशाने तर १६ सप्टेंबरला ३ रुपये ४५ पैसे आणि १ आॅक्टोबरला १ रुपये १९ पैशाने वाढ करण्यात आली. एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल दरात वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.तसेच आतापर्यंत पीएमपीने एवढ्या महागाईचे इंधन कधीही खरेदी केलेले नव्हते. सीएनजीच्या दरातही आॅगस्ट महिन्यात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. पीएमपीला सध्या प्रतिकिलो ५० रुपयांनी सीएनजीचा पुरवठा होता. त्यासाठी दररोज २० लाख रुपये मोजावे लागत आहेत. केवळ इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे इंधनावरील हा खर्च पीएमपीचे कंबरडे मोडणारा ठरत आहे.मागील महिनाभरातील डिझेल दरातील वाढदि. १ सप्टेंबर - १ रुपये ६० पैसेदि. १६ सप्टेंबर - ३ रुपये ४५ पैसेदि. १ आॅक्टोबर - १ रुपये १९ पैसेइंधनावरील दैनंदिन खर्च (अंदाजे)बस इंधन गरज खर्चडिझेल ८०० ४० हजार लिटर ३० लाख रुपयेसीएनजी ६०० ३८ ते ४० हजार किलो २० लाख रुपये 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल