शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

ढोल ताशा पथकांना सरावासाठी जास्त दिवस मिळतील : मुक्ता टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 19:22 IST

आजूबाजूच्या नागरिकांना वादनाचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पथकांनी आचारसंहितेचे पालन करावे. यामुळे नियमांचे उल्लंघन न होता उत्साहाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करता येईल.

ठळक मुद्देढोल ताशा महासंघाच्या वतीने वाद्यपूजन ढोल-ताशा महासंघ व पथकांकरीता कोणतीही मदत लागल्यास महापालिका व महापौर म्हणून आम्ही सदैव हजर

पुणे : लोककल्याणासाठी आणि नागरिकांनी एकत्र यावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला. त्याच उत्सवातील ढोल पथकांनी नवी ओळख मिळविली. तसेच या उत्सवाचे बदलते स्वरुप साता समुद्रापार नेले. या ढोल-ताशांच्या पूजनाने उत्सवाचे पडघम सुरु झाले आहेत. नदीच्या कडेला पथकांचे मंडप घालायला सुरुवात झाली आहे. परंतु, आजूबाजूच्या नागरिकांना वादनाचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पथकांनी आचारसंहितेचे पालन करावे. यामुळे नियमांचे उल्लंघन न होता उत्साहाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करता येईल. यावर्षी पथकांना जास्तीत जास्त दिवस सरावासाठी मिळतील असा प्रयत्न करु, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रतर्फे केसरी वाडयात वाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, रोहित टिळक, अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ.मिलींद भोई, शेखर देडगावकर, शिरीष मोहिते, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, संजय सातपुते, शिरीष थिटे, अनुप साठये यांसह विविध पथकांचे प्रमुख व वादक उपस्थित होते. मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘ढोलताशा पथकांच्या वादनामुळे विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो, अशी तक्रार येते. त्यामुळे पथकांनी आचारसंहिता ठरवून एका चौकात १५ मिनिटे वादन करुन पुढे मार्गस्थ व्हावे. जेणेकरुन रात्रीच्या लायटिंगचे देखावे असणा-या मंडळांना मिरवणुकीत वेळेत सहभागी होता येईल. ढोल-ताशा महासंघ व पथकांकरीता कोणतीही मदत लागल्यास महापालिका व महापौर म्हणून आम्ही सदैव हजर आहोत.’ अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, ‘पुढील आठवडयात पोलीस प्रशासनासोबत बैठक होणार असून पथकांनी परवानगी घेतल्यानंतर वादनाच्या सरावाला सुरुवात करावी. अजूनही अनेक जणांवर मागील वर्षीचे खटले सुरु आहेत. आपण सर्व परवानग्या मिळवू मात्र पथकांनी घाई करु नये.’ पराग ठाकूर म्हणाले, ‘ढोल-ताशा महासंघ केवळ पुण्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून पथकांची नोंदणी होत आहे. ढोल-ताशांसोबत नवनवीन वाद्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न पथकांनी करायला हवा. पथकांच्या सरावाच्या परवानगीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.’ संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकGaneshotsavगणेशोत्सव