शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Ravindra Dhangekar | "धंगेकर इज विनर..." मविआ कार्यकर्त्यांचे चंद्रकांत दादांच्या प्रश्नाला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 10:58 IST

गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी केला जल्लोष...

पुणे : सुरुवातीपासूनच राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा गुरुवारी निकाल लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आणि कसब्याच्या २८ वर्षांच्या इतिहासात प्रथमत कसबा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून गेला. यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत निवडणुकीच्या प्रचारावेळी पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी ‘हू इज धंगेकर?’ या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत ‘धंगेकर इज विनर’च्या घोषणा दिल्या.

गुरुवारी सकाळी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात सकाळी आठ वाजता कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी साडेसातपासूनच युती आणि मविआचे काही कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर उभे राहिले होते. यावेळी प्रत्येकाला आपलाच उमेदवार निवडून येईल, असा आत्मविश्वास होता. पहिल्या फेरीपासूनच धंगेकरांनी आघाडी घेतल्याने, चौथ्या फेरीपर्यंत ते तीन हजारांच्या आघाडीवर होते, त्यामुळे दहाच्या सुमारास मविआच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. यानंतर सतत रवींद्र धंगेकर आघाडीवरच असल्याचे दिसून येताच साडेअकराच्या सुमारास युतीचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रापासून लांब जाण्यास सुरुवात झाली. दरम्यान, हे सगळे होत असताना रवींद्र धंगेकर मात्र कसब्यातील आपल्या संपर्क कार्यालयातच होते. पावणे बाराच्या सुमारास धंगेकरच निवडणूक जिंकणार हे १३ व्या फेरीलाच स्पष्ट झाल्याने, मविआच्या कार्यर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली.

‘गणपती बाप्पा मोरया’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘कोण आला रे कोण आला, कसब्याचा वाघ आला’, ‘पुणेकरांना परिवर्तन पाहिजे होते ते मिळाले’, ‘शाहू, फुले, आंबेडकर निवडून आले धंगेकर’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी एकमेकांवर गुलाल उधळत, ताशाच्या तालावर नाचण्यास सुरुवात केली होती. १२ वाजून पाच मिनिटांनी रवींद्र धंगेकर यांचे मतमोजणी केंद्राच्या परिसरात आगमन होताच, कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घालत खांद्यावर उचलून घेतले. यावेळी मविआच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीदेखील मोठी गर्दी दिसून आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी विशेष कपडे शिऊन घेतले होते. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाचे चिन्ह आणि डोक्यावरील गांधी टोपीवर ‘मी रवी धंगेकर’ असा गणवेश परिधान केला होता. यावेळी पोलिसांचादेखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस अधिकारीदेखील मतमोजणी केंद्राला भेट देत होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkasba-peth-acकसबा पेठcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र