शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

‘महाळुंगे-माण’ हायटेक सिटीमध्ये भूमिपुत्रांना भागीदारी : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 16:46 IST

पीएमआरडीएच्या ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ या महत्त्वकांशी योजनेला सर्व स्थानिक शेतकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा आदर्श प्रकल्प करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

ठळक मुद्देपायाभूत सुविधांच्या विकास कामांचा शुभारंभ पीएमआरडीएला नगर रचना विभागाच्या नियमानुसार १४ टीपी स्कीम उभ्या करण्याचे अधिकार हायटेक सिटीच्या पायाभूत सुविधांसाठी पीएमआरडीएच्या वतीने ६०० कोटी रूपये खर्च ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’साठी ७०० एकर उभी करण्यात येणार येत्या एप्रिल २०१९ मध्ये या योजनेतील सर्व शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड वाटप

पुणे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या वतीने (पीएमआरडीए) ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’साठी ७०० एकर उभी करण्यात येणार आहे. मात्र यासाठी कोणालाही बेघर, भूमिहीन करणार नाही. तर प्रकल्पासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार प्रकल्पात भागीदारी देणार आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित सर्व शेतकऱ्यांना दिले. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ ६२० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकास कामाच्या शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्र गिरीश बापट, सामाजिन न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार बाबूराव पाचर्णे, संग्राम थोपटे,  मेधा कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पीएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त प्रवीणकुमार देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, या हायटेक सिटीच्या पायाभूत सुविधांसाठी पीएमआरडीएच्या वतीने यापैकी ६०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या यामध्ये गुंतवणूक करणार आहेत. साधारण दीड लाख लोकांना व्यावसायिक आणि रहिवासी कारणांसाठी या सिटीचा उपयोग करता येणार आहे. तीन वर्षानंतर यामधून पीएमआरडीएला उत्पन्न सुरू होणार आहे.   ...................जलसंपदा मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुकराज्यात भाजप आणि शिवसेना हे पक्ष सत्तेत आहेत. मात्र शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व इतर नेत्यांकडून रोज भाजपच्या नेत्यांवर टीका केली जाते. पीएमआरडीएच्या कार्यक्रमात मात्र शिवसेनेचे पुरंदरचे आमदार तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक कामांचे गुणगान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. .......................हिंजवडी पुण्याचे ग्रोथ इंजिनगेल्या काही वर्षा पुणे शहराची वेगाने प्रगती होत आहे. अनेक उद्योग-व्यवसाय, आयटी हब हिंजवडी परिसरात आले आहेत. त्यामुळे पुण्याकडे देशातील वेगवेगळ्या शहरांबरोबच परदेशातील अनेक कंपन्या, विद्यापीठ आकर्षीत झाले आहे. त्यामुळे येणाºया काळात याठिकाणी हजारो कोटींची गुंतवणूक वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधील पुणे जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बरोबर पीएमआरडीएने समन्वय साधून पायाभूत सुविधा उभ्या केल्या पाहिजेत. तरच पुण्याचे विकास वेगाने होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ........................मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएला नगर रचना विभागाच्या नियमानुसार १४ टीपी स्कीम उभ्या करण्याचे अधिकार दिले आहेत. त्याप्रमाणे आॅक्टोबर २०१८ साली नगर रचना लवाद नेमण्यात आला आहे. पीएमआरडीएच्या ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ या महत्त्वकांशी योजनेला सर्व स्थानिक शेतकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा आदर्श प्रकल्प करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या एप्रिल २०१९ मध्ये या योजनेतील सर्व शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात येणार आहे. - किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्ते