शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

राजस्थान आणि कर्नाटकात विकासकामे ठप्प, घोषणाही अपूर्ण; PM नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:57 IST

कर्नाटकात चुकीच्या घोषणा देऊन सरकार स्थापन तर राजस्थानात कर्जाचा डोंगर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर मेट्रो च्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून केले. तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक आणि राजस्थान सरकारवर टीका केली आहे. 

आज भारत सर्वात गतीने 5 जी सर्व्हिस देणारा देश होत आहे. या देशातील तरुण सर्वच क्षेत्रात कमाल करत आहेत. महाराष्ट्र एकीकडे विकास करत असताना दुसरीकडे कर्नाटकात काय होत आहे ते आपण पाहतो. ज्याप्रमाणे विकास होणे अपेक्षित होते तसा कर्नाटक राज्याचा विकास होताना दिसत नाही. ज्या घोषणा दिल्या त्या पूर्ण होत नाहीत. ही परिस्थिती देशासाठी खुप चिंताजनक आहे. हीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे. त्याठिकाणी विकासाची कामे ठप्प झाली असल्याचे मोदी यावेळी म्हणाले आहेत. 

मेट्रो नेटवर्क आधुनिक भारत ची नवी लाईफलाईन

मला पुण्यात येण्याचं सौभाग्य मिळालं. देशभर स्वप्नांना पूर्ण करणारा पुणे हे जिवंत शहर आहे. आता १५ हजार करोड रुपये प्रकल्पांचं उदघाटन झालं आहे. हजारो लोकांना घरे मिळाली आहेत. आमचे सरकार मध्यमवर्गीय लोकांच्या हिताचं सरकार आहे.  पुणे मेट्रोच्या अजून एक स्टेशनच लोकार्पण झालं आहे. या पाच वर्षात मेट्रो नेटवर्क सुरु झालाय. आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट ला आधुनिक बनवावा लागेल. यासाठी मेट्रोचा विस्तार होतोय.  देशातील मेट्रो नेटवर्क ८०० किलोमीटर पेक्षा जास्त. २०१४ मध्ये ५ शहरात मेट्रो नेटवर्क होता. आज देशातील २० शहारत मेट्रो आहे. मेट्रो नेटवर्क आधुनिक भारताची नवी लाईफलाईन आहे.

सर्वांची स्वप्न पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी

2014 मध्ये तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. मागील 9 वर्षात आमच्या सरकारने गाव आणि शहरात 4 करोड घरे तयार केलीत. शहरी गरिबांसाठी 75 लाख घरे आम्ही तयार केली. जी घरे आम्ही तयार करतो त्यातील सर्वाधिक घरे महिलांच्या नावावर केली जातात.. या घरांची किंमत काही लाखात आहे. या माध्यमातून मागील काही वर्षात अनेक बहिणी लखपती झाल्यात. गरीब असो की मध्यमवर्गीय या सर्वांची स्वप्न पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीKarnatakकर्नाटकRajasthanराजस्थानBJPभाजपाPoliticsराजकारण