खेड तालुक्यातील विकासकामे प्राधान्याने मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:29+5:302021-02-05T05:12:29+5:30
कुरुळी : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेचच कोरोनाचेही संकट ओढवले. त्यामुळे विकासकामे करण्याची इच्छा असूनही सरकारने प्रथमदर्शी ...

खेड तालुक्यातील विकासकामे प्राधान्याने मार्गी लावणार
कुरुळी : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेचच कोरोनाचेही संकट ओढवले. त्यामुळे विकासकामे करण्याची इच्छा असूनही सरकारने प्रथमदर्शी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यान्वित केल्या. परिणामी विविध विकासकामांना खीळ बसली होती. मात्र परिस्थिती सुधारत चालल्याने आगामी काही दिवसांत खेड तालुक्यातील आवश्यक ती सर्व विकासकामे मार्गी लावली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे-नाशिक महामार्गावरील चिंबळी फाटा (ता. खेड) येथे गायकवाड पेट्रोलियमचे (भारत पेट्रोलियम) उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते-पाटील, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, अंकुश पठारे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, माजी सरपंच सुदाम मुऱ्हे, दिलीप भोसले, अनिल घुले, विलास कातोरे, राजेंद्र वाळुंज, मोहम्मदभाई पानसरे, सुभाष होले, चंदन मुऱ्हे, पाटील गवारी, देवराम सोनवणे, गुलाब सोनवणे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आगामी काळात पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले तरी मला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली. दररोज वाहनांच्या संख्येने वाढ होत असून, त्यांची गरज ओळखून गायकवाड परिवाराने पंपाच्या माध्यमातून सर्वांच्या इंधनाची सोय केल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले. गायकवाड पेट्रोलियमचे मालक सागर गायकवाड तसेच त्यांच्या परिवाराचे अजितदादांनी व खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साकोरे तर शरद मुऱ्हे यांनी आभार मानले.
" पिंपरी चिंचवड,भोसरी व चाकणमधून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम तसेच रिंग रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सरकारदरबारी चालू आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री.
२९ कुरुळी
चिंबळी येथे पेट्रोल पंपाचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर.