केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा जास्त विकास; रोहित पवारांची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 05:11 PM2024-04-27T17:11:38+5:302024-04-27T17:12:40+5:30

सरकाराने शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा विकास केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपावर केली.....

Development of companies rather than farmers by central government; Rohit Pawar's criticism of BJP | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा जास्त विकास; रोहित पवारांची भाजपावर टीका

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा जास्त विकास; रोहित पवारांची भाजपावर टीका

वरवंड (पुणे) : सरकारने शेतमालाची बिकट परिस्थिती केली. कांदा, ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सरकाराने शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा विकास केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपावर केली.

वरवंड येथे बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, रामभाऊ टुले, अजित शितोळे आदी कार्यकर्ते- पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, मोदी सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गाच्या अडचणींवर बोलत नाही तसेच या सरकारने शेतकरी विरोधात धोरणे राबून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. शरद पवार यांनी समाजाला न्याय दिला आहे. जनता आमच्या बरोबर आहे, मात्र काहींनी शब्द पाळला नाही, आम्हाला सोडून गेले आहेत. तसेच, दौंडची जनता स्वाभिमानी आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांना दौंड तालुक्यातील जनता नक्कीच मतांचे लीड देतील. अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे पूर्वी एकमेकांचा विरोधात बोलत होते मात्र आता पेढे भरवत आहेत हे जनता कदापि मान्य करणार नाही.

Web Title: Development of companies rather than farmers by central government; Rohit Pawar's criticism of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.