जबाबदारीचे भान आल्यास नेतृत्व कौशल्याचा विकास : वसंतराव माळुंजकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:46+5:302021-02-05T05:13:46+5:30

इंदापूर : तरुणांना आपल्या आयुष्यातील मिळालेल्या संधीचे सोने करण्याची आवश्यक असते. त्यासाठी विविध सामाजिक कार्यातून तरुणांमध्ये नेतृत्वगुण कौशल्य शिकण्याची ...

Development of leadership skills if you realize responsibility: Vasantrao Malunjkar | जबाबदारीचे भान आल्यास नेतृत्व कौशल्याचा विकास : वसंतराव माळुंजकर

जबाबदारीचे भान आल्यास नेतृत्व कौशल्याचा विकास : वसंतराव माळुंजकर

इंदापूर : तरुणांना आपल्या आयुष्यातील मिळालेल्या संधीचे सोने करण्याची आवश्यक असते. त्यासाठी विविध सामाजिक कार्यातून तरुणांमध्ये नेतृत्वगुण कौशल्य शिकण्याची संधी मिळत असते. मात्र तरुणांना मिळालेल्या जबाबदारीचे भान आल्यास त्यांच्यामध्ये नेतृत्व कौशल्याचा विकास होतो, असे प्रतिपादन रोटरीचे पुणे जिल्हा यूथ डायरेक्टर वसंतराव माळुंजकर यांनी केले.

इंदापूर पंचायत समितीच्या, लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात रोटरी क्लब ऑफ इंदापूर संचालित रोट्रॅक्ट कल्ब ऑफ इन्द्रेश्वरच्या पदाधिकारी व सदस्यांचा पदग्रहण समारंभ झाला. यावेळी पुणे जिल्हा यूथ डायरेक्टर रोट्रीयन वसंतराव माळुंजकर, डी. डी.आर श्रद्धा लामखडे, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष अजिंक्य इजगुडे, इंदापूर तालुका यूथ डायरेक्टर महेंद्रदादा रेडके, तुषार रंजनकर, नगरसेवक प्रशांत शिताप, डायरेक्टर सुनील मोहिते, रोट्रॅक्ट अध्यक्ष विश्वास गाढवे, सचिव अमोल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक अमोल राऊत यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वलेकर यांनी केले.आभार सागर शिंदे यांनी मानले. यावेळी नूतन संचालक व सभासदांना बॅचचे सन्मानाने वितरण करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा युवक प्रतिनिधी श्रद्धा लामखडे, विभागीय सहायक अध्यक्ष भावना मेरपुरे, पुणे विभागाचे प्रतिनिधी विक्रांत आहेर, पुणे जिल्हा युवक विकास अधिकारी विजय चव्हाण, पुणे जिल्हा संपर्क अधिकारी करिश्मा आवारी आदी मान्यवर उपस्थिती होते.

यावेळी रोट्रॅक्ट अध्यक्षपदी विश्वास गाढवे, सचिव पदी अमोल राऊत, उपाध्यक्षपदी महेश हवालदार, सार्जंट एट आर्म्सपदी सागर शिंदे, खजिनदार सागर आवटे, सहसचिव राज गार्दी, व्यवसायिक विकास अधिकारी ज्ञानेश्वर वलेकर संचालकपदी सचिन चौगुले, दीपक जगताप, मुन्ना ढाले, अजय कांबळे, पल्लवी धानूरकर, रणजित परांडे, आकाश अग्रवाल, गायत्री चोरमले, हर्षदा राऊत, आकाश व्यवहारे आदींची निवड करण्यात आली.

: इंदापूर येथे निवड नूतन पदाधिकारी व सभासदांचा सन्मान करताना रोट्रीयन्स

Web Title: Development of leadership skills if you realize responsibility: Vasantrao Malunjkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.