शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Crypto Currency: क्रिप्टो एक्सचेंज सुरु करणार्‍या व्यावसायिकाला व्हिएतनाममधील डेव्हलपरने घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 1:25 PM

सर्व्हर हॅक करुन पळविले क्रिप्टॉक्स टोकन, बायनाज एक्सचेंजने गोठविली काही रक्कम

पुणे : क्रिप्टो एक्सचेंज सुरु करीत असलेल्या एका पुण्यातील व्यावसायिकाला व्हिएतनाममधील डेव्हलपरने आपल्या साथीदारांच्या मदतीने २ लाख ३४ हजार क्रीप्टॉक्स टोकन स्वत:कडे वळवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, हे चोरलेले टोकन बायनाज एक्सचेंजवर विक्री झाल्याचे समजल्यानंतर बायनाजने वॉलेटमध्ये असलेली रक्कम गोठविली आहे. याप्रकरणी बावधन येथे राहणार्‍या एका २९ वर्षाच्या व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वो थी हाँग, वांग जंग (ट्रान व्हॅन विन्ह) न्युदेनखाक थिन्ह (सर्व रा. व्हिएतनाम) आणि सुमा अख्तर (रा. बांगला देश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ जानेवारी ते २५ एप्रिल २०२२ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांची कंपनी आहे. ते क्रिप्टो एक्सचेंज सुरु करीत आहेत. त्यासाठीचे व्हिएतनाममधील वांग जंग (व्हिएतनाम) याला कोंडिग करण्याचे काम दिले होते. अन्य कामे पुण्यातून होत होती. त्यांनी सॉफ्टवेअर कसे काम करते, याची तपासणी करण्यासाठी काही क्रिप्टो खरेदी केले होते. ते त्यांनी सर्व्हरवर ठेवले होते. १७ एप्रिल रोजी फिर्यादी यांचा सर्व्हर अचानक बंद पडला. तो सुरु करण्यास त्यांना तीन दिवस लागले. त्यानंतर त्यांनी पाहिले तर त्यांच्या सर्व्हरवर असलेले सर्व टोकन गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी ही बाब वांग जुंग याला सांगितली. तेव्हा त्याने कोणीतरी सर्व्हर हॅक केला असून त्याने सर्व टोकन घेतले आहेत.  आम्ही चौकशी करुन सांगतो, असे त्याने सांगितले. त्याबरोबर फिर्यादी यांनी चौकशी सुरु केली. तेव्हा सर्व काम वांग युंग यानेच केल्याचे व त्यानेच सर्व्हरवरील टोकन चोरल्याचे आढळून आले. कोडिंगचे काम करीत असताना त्यांनी या डेटामधील कंपनीचे हॉट व्हॉलेटची प्रायव्हेट की व सर्व्हरचे इतर पासवर्ड चोरले. कंपनीच्या सर्व्हरमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन सर्व्हरवरील हॉट वॉलेटमधील २३ हजार ६०४ डॉलर अंदाजे २३ लाख ८८ हजार ३२० रुपयांचे एकूण २ लाख ३४ हजार १३४ क्रीप्टॉक्स टोकन  ऑनलाईन पद्धतीने स्वत:चे व साथीदारांच्या खात्यावर युएसडीटी टोकनमध्ये वळून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. त्यांनी वांग युंग याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने ते कबुल केले व पण आता पैसे नसल्याचे सांगितले. दरम्यान, या क्रिप्टो टोकनचा शोध घेतला असता ते बायनाज एक्सचेंजवर विकण्यात आल्याचे आढळून आले. फिर्यादी यांनी बायनाज एक्सचेंजशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी वॉलेटमध्ये शिल्लक असलेले ८ लाख रुपये गोठविले आहेत. फिर्यादी यांना आता न्यायालयात दावा करुन हे गोठविलेले पैसे मिळावावे लागणार आहेत. पोलीस निरीक्षक चिंतामण अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCryptocurrencyक्रिप्टोकरन्सी