- शगुफ्ता शेख वेल्हे - एप्रिल महिन्यात वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे राजगड किल्ल्यावर पाण्याची आणि अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गडावर राहणाऱ्या माकडांसह इतर मुक्या प्राण्यांची अवस्था हालाखीची झाली आहे. मात्र या कठीण परिस्थितीत पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे यांनी या मुक्या जीवांसाठी एक देवदूत ठरवत स्वखर्चातून दररोज अन्न व पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. जसा त्याचा जीव, तसाच माझा जीव..या भावना मनात ठेवत बापू साबळे यांनी गडावरील प्राण्यांसाठी स्वतःहून पुढाकार घेतला आहे. पर्यटकांची संख्या उन्हामुळे कमी झाल्याने माकडांना पूर्वीप्रमाणे उरलेले अन्न मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांनी स्वखर्चातून दररोज माकडांना अन्नपुरवठा सुरू केला आहे.
जसा माझा जीव, तसाच त्यांचा जीव...! राजगडावर उन्हाच्या तडाख्यात मुक्या जीवांसाठी धावला ‘देवदूत’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:18 IST