शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 17:57 IST

रस्त्यावर टेबल मांडत सोडवल्या नागरिकांच्या अडचणी, रासनेंनी दीड वर्षात बदललं कसब्याचं गणित, भाजपकडून मिळाली संधी.

BJP Hemant Rasne ( Marathi News ) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील ६ मतदारसंघातील उमेदवार देखील घोषित करण्यात आले असून, कसबा मतदारसंघातून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रासने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु गेल्या दीड वर्षांमध्ये रासने यांनी मतदारसंघात संघटना बांधणीसोबतच नागरिकांमध्ये जात केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा उमेदवारी मिळवली आहे.

पोटनिवडणुकीनंतर हेमंत रासने यांनी मतदारसंघात असणाऱ्या सहाही प्रभागांतील रस्त्यावर टेबल मांडत जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. महाआरोग्य अभियान, लाडकी बहीण योजनेची नोंदणी मोहीम तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवला. भाजपने रासने यांच्यावर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी कसब्यात मजबूत संघटना बांधणी केल्याने लोकसभा निवडणुकीत आपल्याच मतदारसंघात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर पिछाडीवर गेले. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जवळपास १५ हजारांचे मताधिक्य कसब्यात मिळवले, याचीच फलश्रुती उमेदवारी मिळवण्यात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

भाजपच्या सर्व सर्व्हेत रासने राहिले आघाडीवर कसबा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी रासने यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे, कुणाल टिळक, स्वरदा बापट इच्छुक होत्या. उमेदवार निवडीसाठी भाजपकडून ५ ते ६ सर्व्हे करण्यात आले, ज्यामध्ये हेमंत रासने यांचेच नाव आघाडीवर राहिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasba-peth-acकसबा पेठwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाravindra dhangekarरविंद्र धंगेकर