शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या 'वर्क फ्रॉम होम'च्या आदेशाला अनेक आयटी कंपन्यांचा खो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 22:30 IST

येरवड्यात जेल रस्त्यावरील कॉमरझोन आयटी पार्कमध्ये सुमारे ५० आयटी आणि कॉलसेंटर कंपन्या

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्याचे बंधनकंपन्या, सार्वजनिक कार्यालये व इतर आस्थापना बंद करून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभाप्रत्येकाला तपासून प्रवेश: कंपन्या बंद करण्याची सक्ती नाही

विशाल थोरात - पुणे : येरवडा, विमाननगर, नगर रस्ता व खराडी परिसरातील अनेक आयटी कंपन्या व कॉल सेंटर गुरुवारीही (दि. १९) सुरूच होते. या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी एकत्रित काम करतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या 'वर्क फ्रॉम होम'च्या आदेशाला काही कंपन्या हरताळ फासत असल्याचे दिसले. तर अनेक कंपन्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक साधन सुविधा उपलब्ध करून घरून काम करण्याची मुभा दिल्याने या कंपन्यांची कार्यालये बंद केल्याचेही दिसून आले.  येरवड्यात जेल रस्त्यावरील कॉमरझोन आयटी पार्कमध्ये सुमारे ५० आयटी आणि कॉलसेंटर कंपन्या आहेत. एका-एका कंपनीत ५०० ते २ हजारांपर्यंत कर्मचारी काम करतात. यातील बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. मात्र, याठिकाणी गुरुवारीही अनेक कंपन्या सुरू असल्याचे दिसले. तर अनेक कर्मचारी आयटी पार्कबाहेर घोळक्याने थांबून गप्पा मारत अथवा चहानाष्टा घेत उभे असल्याचे दिसले. या आयटी पार्कची सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आली आहेत. केवळ जेल रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वारातून कर्मचारी व वाहनांना प्रवेश दिला जात आहे. याठिकाणी 'बॉडी टेम्परेचर स्कॅनर गन'च्या साह्याने आयटी पार्कमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे शरीराचे तापमान मोजले जात होते. सामान्यापेक्षा जास्त ताप आढळलेल्या व्यक्तीला बाहेरच थांबवण्यात येत होते. याठिकाणी चौकशी केली असता जवळपास सर्वच कंपन्या बंद करून कर्मचाºयांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. अनिवार्य कारणास्तव काही कंपन्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली.  विमाननगरमध्ये निको गार्डन सोसायटीसमोरील एक्सा सर्व्हिसेस व इतर देशांचा व्हिसा देणारी कंपनीही गुरुवारी सुरू होती. मात्र, एक्सा कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरून काम करता यावे, यासाठी कारवाई सुरू केली आहे. कदाचित सोमवारपासून घरून काम करण्यास मुभा मिळेल, असे या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर नगर रस्त्यावरील इन ऑर्बिट मॉल व खराडीतील इऑन आयटी पार्कमधील काही आयटी कंपन्याही गुरुवारी सुरू होत्या.  याबाबत प्रतिक्रिया देताना येरवड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख म्हणाले, की आमच्या हद्दीतील कंपन्या, कार्यालये व इतर आस्थापना गरज नसताना सुरू न ठेवण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या आहेत. मात्र, काही कंपन्यांचा कारभार आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असल्याने अनिवार्य कारणास्तव या कंपन्या सुरू ठेवण्यात आल्या असल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातही कंपन्या सक्तीने बंद न करण्याच्या सूचना आहेत. मात्र, अनिवार्य कारणास्तव सुरू राहणाऱ्या कंपन्यांनी त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवणे आवश्यक आहे. याबाबत सदर कंपन्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून तशी कारवाई सुरू केली आहे.

विमानतळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात कंपन्या बंद करण्याची सक्ती नसल्याचे म्हटले. तरीही सुरू असलेल्या कंपन्यांबाबत माहिती घेऊन त्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. .................... चौकाचौकांत गर्दी टाळावी... 

कंपन्या, सार्वजनिक कार्यालये व इतर आस्थापना बंद करून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिल्याने गर्दी कमी होत आहे. मात्र येरवड्यातील गोल्फ चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी येणारी-जाणारी एकाचवेळी हजार-पाचशे माणसे दिसतात. नागरिकांनी विनाकारण प्रवास करणे अथवा घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाITमाहिती तंत्रज्ञानNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस