शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करूनही मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेत नाहीत - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:07 IST

महायुतीचेच सुरेश धस, साळुंखे यांनी राजीनाम्याची मागणी करूनही मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेत नाहीत

बारामती : आमदार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. महायुतीच्याच नेत्यांकडून मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. अशातच बारामतीत सुप्रिया सुळेंना मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता याचे उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे असं त्या म्हणाल्या आहेत. महायुतीचेच सुरेश धस, साळुंखे यांनी राजीनाम्याची मागणी करूनही मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेत नाहीत. याबाबत त्यांनाच विचारावे लागेल, असेही सुळे यांनी यावेळी नमुद केले. खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अद्याप पालकमंत्र्यांचा तिढा सुटला नाही. या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी अनेक वर्ष सत्ता जवळून पाहिली आहे. मात्र पालकमंत्री पदावरून एवढी रस्सीखेच कधीही मी आजवर पाहिली नाही. मात्र पालकमंत्री पदात काय गुढ आहे. हे मला आजवर समजले नाही. असं सुळे म्हणाल्या. दिल्लीत होत असलेल्या निवणुकीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांना अनेक मतदार कुठून आले आहेत हेही माहित नाही. याची यादीच त्यांनी सादर केली. त्यामुळे निवडणूक आयोगाला आमची एवढीच विनंती आहे की, पारदर्शकपणे निवडणूक व्हावी. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

 उपमुख्यमंत्री पवार यांनी ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय..?.असं वक्तव्य बारामतीत बोलताना नुकतेच केले आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार कुटुंबा बाबत माझ्या मनात काल आज आणि उद्याही मनभेद आणि मतभेद कधीच नव्हते. हे सर्वांना माहिती आहे. कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि समाजातील जबाबदाऱ्या उंबरठ्याच्या बाहेर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे . 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमादरम्यान निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला उद्देशून, तुम्ही मते दिली म्हणजे माझं मालक नाही झाला. असे वक्तव्य केले होते. तसेच संजय गायकवाड यांनीही हजार दोन हजार रुपये तुम्ही विकले गेला आहात. असे वक्तव्य केले होते. याबाबत सुळे यांना विचारले असता 'राम कृष्ण हरी' असे म्हणत एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीSuresh Dhasसुरेश धस