शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

मूर्तीशास्त्राबाबत समाजात अनास्था : गो. बं. देगलूरकर : ‘चतुरंग’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:04 PM

चतुरंग संस्थेच्या वतीने सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देगलूरकर यांना पुण्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देसिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देगलूरकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ हा माझा सन्मान नसून मूर्तीशास्त्र व मंदिर स्थापत्याचा सन्मान : गो. बं. देगलूरकर

पुणे : ‘देवाला इतके हात, तोंड का दिली, याचा अभ्यासच कोणी करीत नाही. त्यामागे काहीतरी विचार आहे. कारण, मूर्तीशास्त्राबाबत खूप अनास्था आहे. ही अनास्था आता समाजाला परवडणार नाही,’ असे प्रतिपादन डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी रविवारी केले.चतुरंग संस्थेच्या वतीने सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देगलूरकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, वसुंधरा देगलूरकर, सर्जेराव ठोंबरे, डॉ. अरविंद जामखेडकर, डॉ. कविता रेगे, डॉ. शुभदा जोशी, डॉ. सागर देशपांडे उपस्थित होते. पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करताना देगलूरकर यांनी हा माझा सन्मान नसून मूर्तीशास्त्र व मंदिर स्थापत्याचा सन्मान असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मूर्तीशास्त्र हा विषय खुप दुर्लक्षित, उपेक्षित राहिला आहे. मूर्तीचा अभ्यास करीत असताना मूर्तीची पूजा न करणारा कोणत्याही धर्मातील व्यक्ती आढळला नाही. प्रत्येक धर्मामध्ये परमेश्वराचे अव्यक्त रूप असते. या रूपाची उपासना होते, याचा अर्थ मूर्तीचीच पूजा होते. भारतातील लोक दानवांचीसुद्धा पूजा करतात, असे इंग्रज म्हटले होते. पण, देवांना इतके हात-तोंड का दिली, ही कल्पना त्यांना समजणार नाही. मूर्तीचा अभ्यास करताना मी त्यांच्याशी समरस झालो. त्या माझ्याशी बोलत असतात. ज्ञानेश्वरमहाराजांची समाधी परिष्कृत करताना माझे हात पुण्यवान झाले. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक अनेक आहेत; पण अभ्यास करून मूर्ती परिष्कृत करणारा मीच आहे. आता हे ज्ञान सर्वत्र पसरत आहे. मला अजून खूप अभ्यास करायचा असून, या पुरस्कारामुळे आणखी ऊर्जा मिळाली आहे, अशी भावना देगलूरकर यांनी व्यक्त केली. देगलूरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पाटील यांनी आता नव्या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवतील, नव्या वाटा शोधतील अशा व्यक्तींचा सन्मान व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुग्धा गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेDeccan Collegeडेक्कन कॉलेजsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर