शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरच्या विकासाला चालना देण्याची इच्छा; प्रवीण माने करणार भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:52 IST

मतदारांच्या आशीर्वादाने अपक्ष म्हणून मागील विधानसभा निवडणूक लढवली, पक्ष नसताना कमी कालावधीत लढवलेल्या या निवडणुकीत मानेंना मतदारांनी ४० हजार मते दिली होती

इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य प्रवाहात येण्याची सूचना, त्यासाठी असणारा कार्यकर्त्यांचा रेटा व इंदापूर तालुक्याच्या विकासाला चालना देण्याची इच्छा यामुळे आपण बुधवारी ( दि.२) चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये होणा-या कार्यक्रम भाजपमध्ये प्रवेश करत आहोत,अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य, सोनाई उद्योग समुहाचे संचालक प्रवीण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऑगस्ट महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदापूरात कार्यकर्ता व शेतकरी मेळावा घेण्याचे नियोजन सुरु आहे असे ही माने यांनी स्पष्ट केले. माने यांच्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेस मयुर पाटील, बबन लावंड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.    प्रवीण माने म्हणाले, २०१७ ला सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलो. पाच वर्षात इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी हजार कोटी रुपयांचा निधी आणला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, मतदारांच्या आशीर्वादाने अपक्ष म्हणून मागील विधानसभा निवडणूक लढवली. पक्ष नसताना कमी कालावधीत लढवलेल्या या निवडणुकीत मतदारांनी ४० हजार मते दिली. नंतरच्या काळात लोकांनी आणलेली शासनाच्या पातळीवरची कामे करण्यासाठी, प्रशासकीय अडचणी येऊ लागल्याने, मुख्य प्रवाहात येण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. दरम्यानच्या काळात या संदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, रवींद्र चव्हाण दौंडचे आ. राहुल कुल व इतर नेत्यांबरोबर आमची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही अनेक भेटी झाल्या. त्यांनी ही मुख्य प्रवाहात यावे असे सांगितले. त्यामुळे सारासार विचार करुन आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करताना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला जाईल. पक्ष देईल ती जबाबदार पार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल असे माने यांनी स्पष्ट केले. या वेळी मयुर पाटील,बबन लावंड यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPoliticsराजकारणZP Electionजिल्हा परिषदvidhan sabhaविधानसभाMahayutiमहायुती