इच्छुकांचा सोशल मीडियावर ठिय्या

By Admin | Updated: May 23, 2016 01:44 IST2016-05-23T01:44:36+5:302016-05-23T01:44:36+5:30

महापालिका निवडणूक २०१७साठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी सोशल मीडियावर आतापासूनच मतदारांशी

Desire on social media | इच्छुकांचा सोशल मीडियावर ठिय्या

इच्छुकांचा सोशल मीडियावर ठिय्या

भोसरी : महापालिका निवडणूक २०१७साठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी सोशल मीडियावर आतापासूनच मतदारांशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. सकाळी उठल्यानंतर सुप्रभात असा संदेश देऊन दिवसभर विविध प्रकारच्या संदेशांचा मारा केला जात आहे. सायंकाळी शुभरात्री असा संदेश देऊनच दिवसभराच्या संपर्क अभियानाचा समारोप होत आहे.
मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना हाताशी धरून इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज पाठवले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील मतदारांच्या फोन नंबरची यादी बनवली आहे.
यामध्ये कार्यकर्त्यांपासून ते तरुण-तरुणी, गृहिणी महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे फोन क्रमांक मिळविले आहेत. त्यांचे वेगवेगळे ग्रुप बनविण्यात आले आहेत. या ग्रुपवर कार्यकर्त्यांकडून विविध मेसेज पाठविण्यात येतात. सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंगचा मेसेज पाठविण्यात येतो. यामध्ये एखादी इमेज वापरण्यात येते. झालेल्या विविध कार्यक्रमांची प्रसिद्धी केली जाते. होणाऱ्या कार्यक्रमांची माहितीही दिली जाते. यासाठी टेक्स्ट मेसेज, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक यांवरून मेसेज पाठविण्यात येतात.(वार्ताहर)

Web Title: Desire on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.