शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
3
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
4
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
5
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
6
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
7
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
8
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
9
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
11
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
12
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
13
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
15
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
16
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
17
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
18
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
19
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
20
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 

Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 10:53 IST

पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.

पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. सुरज शुक्ला नावाच्या एका तरुणाने हातात कोयता घेऊन पुतळ्यावर थेट हल्ला चढवला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला एक तरुण रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन तो चौथऱ्यावर चढला आणि पुतळ्यावर कोयत्याने वार करू लागला.

छाती आणि पायावर कोयत्याने वारसुरज शुक्लाने पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने जोरदार वार केले. यावेळी उपस्थित प्रवाशांनी घडलेला प्रकार पाहून तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सुरज शुक्लाला चौथऱ्यावरून खाली उतरवून ताब्यात घेतले. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पुतळ्याच्या डोक्यावर होणारा संभाव्य हल्ला टळला.

कोण आहे सुरज शुक्ला?प्राथमिक माहितीनुसार, सुरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून काही काळापासून तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. त्याने हे कृत्य नेमके कोणत्या हेतूने केले, किंवा तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत. त्याच्याशी संबंधित काही ठोस माहिती मिळवण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सुरक्षा यंत्रणांपुढे मोठं आव्हानया घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देशाचे राष्ट्रपिता असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सार्वजनिक ठिकाणी असे हल्ले होणे हे चिंतेचा विषय मानले जात आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

पुढील तपास पोलिसांकडून सुरूसुरज शुक्लाच्या मानसिक स्थितीबाबतही तपास केला जात आहे. त्याने हे कृत्य आधीपासून नियोजित केले होते का, की अचानक मानसिक असंतुलनातून हे कृत्य घडले, याचा शोध घेतला जात आहे. रेल्वे पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून आरोपीला 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे