शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्काचा उपनिरीक्षक सांगून दारुचे कॅन असलेली कार पळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 12:37 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महिला जवानाविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांची हातभट्टीवाल्यांशी मिली भगत

पुणे : राज्य उत्पादन शुल्क खात्यात पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केलेली गावठी दारुचे कॅन असलेली कारच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच ती परस्पर सोडून देखील दिल्याची घटना घडली आहे. हा प्रकार ११ नोव्हेंबर २०१९ रोजी घडला होता. त्यावर तब्बल ४ महिन्यांनी उघड झाला आहे. .याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक एस. आर. पाटील यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महिला जवान मिनाज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबतची माहिती अशी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी ११ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी आंबेगाव येथील सच्चाई माता मंदिराजवळ एक व्हॅगनॉर कार थांबलेली दिसली. ही कार संशयित वाढल्याने पोलिसांनी कारमधील एकाकडे चौकशी सुरु केली. कारमध्ये पाच हातभट्टी दारुचे कॅन आढळून आले. ही चौकशी सुरु असतानाच तेथे मिनाज शेख ही महिला आली व त्यांनी आपण राज्य उत्पादन शुल्क खात्यात उपनिरीक्षक आहे, अशी बतावणी केली. त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला असल्याचे खोटे  सांगितले. कार व त्यातील व्यक्तीला घेऊन त्या निघून गेल्या होत्या.

याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी घडलेल्या या प्रकाराची माहिती देऊन त्यावर काय कारवाई केली. याची राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून चौकशी केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी केली. तेव्हा अशी कोणती कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौकशीत महिला जवान मिनाज शेख हिनेच उपनिरीक्षक असल्याचे खोटे सांगून हातभट्टी असलेली कार त्या व्यक्तीला बरोबर घेतले व त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठगगिरी करणार्‍या महिला जवानावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिलाliquor banदारूबंदी