शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांचे पत्र की गृहमंत्र्यांची शिफारस वरचढ ठरणार? निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 20:00 IST

राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत प्रशासकीय बदल्या करण्यास परवानगी दिल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुणे : राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत प्रशासकीय बदल्या करण्यास परवानगी दिल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका निकटवर्तीय अधिकाऱ्याला पत्र दिले आहे. तर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देखील एका अधिकाऱ्यांची शिफारस केली आहे. जिल्हयात प्रामुख्याने बहुतेक सर्व महत्त्वाच्या पदांवर पवार यांच्या मर्जीतील अधिका-यांची नियुक्ती होते. पण आता निवासी उपजिल्हाधिकारी पदासाठी वळसे-पाटील यांनी देखील शिफारस केल्याने कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शासनाच्या वतीने दर वर्षी एप्रिल-मे महिन्यात प्रशासकीय बदल्या केल्या जातात. परंतु गत वर्षी कोरोनामुळे प्रशासकीय बदल्या झाल्या नाही. मात्र जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बहुतेक सर्व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांसह नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कुळ कायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस अशी अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात काही अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य व मुदतपूर्व देखील बदल्या झाल्या. याचवेळी आरडीसी बदलाची देखील चर्चा होती. परंतु कटारे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याने ही बदली टळली होती. आता कटारे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आरडीसी बदलीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.  यामध्ये कटारे यांना मुदतवाढ मिळणार का की नवीन अधिकारी कोण येणार याबाबत चर्चा सुरू आहे. 

नवीन आरडीसी म्हणून संजीव देशमुख,संजय पाटील, सुनील थोरवे यांच्यासह ज्योती कदम या अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती. परंतु यात अजित पवार यांनी सध्या मुद्रांक शुल्क विभागात कार्यरत असलेले बारामती तालुक्यात व खेड प्रांत म्हणून काम केलेल्या हिंमत खराडे यांना पत्र दिले आहे. तर वळसे-पाटील यांनी त्याच्या जवळचे व जुन्नर तालुक्यातील सध्या सातारा आरडीसी असलेले सुनील थोरवे यांची शिफारस केली आहे. 

या सर्व अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यात तहसिलदार, उपजिल्हाधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना जिल्ह्याची सर्व माहिती असून, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाचा अनुभव देखील आहे. यामुळे आता नक्की कोण येणार हे बदली नंतरच स्पष्ट होईल.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील