सोलापूरच्या 'त्या'प्रकल्पाबाबत चुकीचे व्रुत्त- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 20:49 IST2023-11-26T20:48:50+5:302023-11-26T20:49:13+5:30
बारामती -सोलापूर येथे होऊ घातलेले अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा कोणताही विचार नाही, याबाबत चुकीचे वृत्त माध्यमांतून पसरविले जात ...

सोलापूरच्या 'त्या'प्रकल्पाबाबत चुकीचे व्रुत्त- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण
बारामती-सोलापूर येथे होऊ घातलेले अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा कोणताही विचार नाही, याबाबत चुकीचे वृत्त माध्यमांतून पसरविले जात आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिले.
यावेळी उमुख्यमंत्री पवार म्हणाले, आमदार सुभाष देशमुख यांनी हे केंद्र बारामतीला नेण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध करत प्रसंगी आमदारकी पणाला लावण्याचा इशारा दिला होता. या बाबत बोलतांना पवार म्हणाले, स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत मिलेट व्हॅल्यूचेंज डेव्हलपमेंट अँड कॅपसिटी बिल्डींग या योजनेचे फूड इनक्युबेशन सेंटर अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने त्याला मान्यता दिली. सोलापूरमध्ये या बाबतच्या वेगळ्या बातम्या पसरल्या गेल्या, हा प्रकल्प बारामतीला आणला, असे दाखविले गेले.अन्न उत्कृष्टता केंद्राचा प्रकल्प वेगळा आहे, तो सोलापूरलाच करण्याबाबतचा निर्णय मागेच झाला आहे, बारामतीचा प्रकल्प वेगळा आहे.या साठ चार कोटींचा निधी राज्याने तर पावणेतीन कोटींचा निधी केंद्राने दिला आहे. हैदराबाद नंतर महाराष्ट्रात अशा प्रकारचे केंद्र प्रथमच होत आहे. बारामतीकर मला निवडून देतो ,त्यांच्या विकासासाठी मी कटीबध्द आहे .
मी बारामतीचा लोकप्रतिनिधी आहे. कामे करताना राज्यातील, जिल्ह्यातील तर झाली पाहिजेच .परंतु बारामतीतही चांगले प्रकल्प यावेत असा माझा प्रयत्न आहे. प्रकल्पाबाबत विपर्यास करणाऱया बातम्या आल्या. परंतु सोलापूरचा प्रकल्प तेथेच निश्चित होईल असे पवार यांनी स्पष्ट केलं.