शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Pune Lok Sabha 2024: मोहोळ, धंगेकर वगळता ३३ जणांचे डिपॉझिट जप्त; ३१ जणांना हजार पेक्षा कमी मतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 09:59 IST

Pune Lok Sabha 2024 पुण्यातील ३३ उमेदवारांचे ८ लाख २५ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा

Pune Lok Sabha 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके या चार जणांसह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant More) यांच्यात झाली. कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे १ लाख २३ हजार १६७ मताधिक्याने निवडून आले. सर्वत्र जल्लोष करत मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी लोकसभेच्या आखाड्यात धंगेकरांना (Ravindra Dhangekar) चितपट केले. 

 भारतीय घटनेने देशात प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. हा अधिकार मिळवत पुणे शहरात प्रमुख पक्षांसह लहान मोठ्या पक्षांचे, तसेच अपक्ष असे मिळून ३५ उमेदवार लाेकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, यापैकी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर वगळता ३३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात सन २०१९ च्या निवडणुकीत ३१ उमेदवार रिंगणात होते. यापैकी २९ जणांचे डिपॉझिट जप्त झाले हाेते.

१ निवडणूक लढण्यासाठी २५ हजार डिपॉझिट 

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज सादर करताना स्वत:ची माहिती, मालमत्ता विवरण पत्र, प्रतिज्ञापत्र व साेबत २५ हजार रुपये डिपॉझिट जमा करावे लागते. पुण्यातील ३३ उमेदवारांचे ८ लाख २५ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

यांचे झाले डिपॉजिट जप्त 

उमेदवार - मिळालेली मते

वसंत मोरे : ३१ हजार ९९१प्रशांत रणपिसे : ३९६९अनिस सुंडके : ८५९मिलिंद कांबळे : ३४४नीरज कामठाण : ३५१मनोज वेताळ : ३५१युवराज लिंबाेळे : ६९८विजयालक्ष्मी सिंदगी : २३९सुब्रोतो राॅय : २९३सुरेश पाटील : ४३७हेमंत पाटील : ३७४अश्विनी खैरनार : ४१२मारुती आंबोरे : ४३३संदीप चोरमोले : १६५५गाेरख घोडके : १४५१किरण रायकर : १०५२चंद्रकांत सावंत : ३१४जॉन्सन कोल्हापुरे : ३०४डॉ. देवयानी पंडित : ६४५नरेंद्र पावटेकर : ५३३रज्जाक बागवान : १४६बाबा सय्यद : १६३डॉ. बाळासाहेब पोळ : २५९महेश म्हस्के : २२९यबिस तुजारे : २२३ॲड. योगेश मकाने : २९८विजय जगताप : ३८२सब्बीर तांबोळी : ३१३सचिन धनकुडे : ७८८सागर पोरे : ५१५संजय केंडाळे : ३११झोंशो विजय प्रकाश : १३८

टॅग्स :Puneपुणेpune-pcपुणेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ravindra dhangekarरविंद्र धंगेकरmurlidhar moholमुरलीधर मोहोळVasant Moreवसंत मोरे