शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

पतसंस्थांच्या ठेवींना मिळणार १ लाखापर्यंतचे संरक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 5:22 PM

राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांमधील ठेवींना १ लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २५ सप्टेंबरला पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या १०२ जयंतीनिमित्त उपाध्याय यांच्या नावानेच ही योजना लागू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआर्थिक अनियमिततेमुळे एखादी बँक डबघाईला गेल्यास त्या बँकेतील ठेवीदारांना १ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षणया योजनेमुळे राज्यातील १३ हजार पतसंस्थांमधील तब्बल १ कोटी ठेवीदांरांना दिलासा

पुणे : राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांमधील ठेवींना १ लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २५ सप्टेंबरला पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या १०२ जयंतीनिमित्त उपाध्याय यांच्या नावानेच ही योजना लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने लोणावळा येथे २५ सप्टेंबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजूदास जाधव आणि महासचिव डॉ. शांतीलाल सिंगी यांनी ही माहिती दिली. आर्थिक अनियमिततेमुळे एखादी बँक डबघाईला गेल्यास त्या बँकेतील ठेवीदारांना १ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण असते. बँक बुडीत निघाल्यानंतरही ठेवीदारांना १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळते. ही सुविधा पतसंस्थांना लागू नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या पैशाला संरक्षण नव्हते. पतसंस्थांना देखील अशी सुविधा देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर, पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण लागू करण्यात येत आहे. या योजनेमुळे राज्यातील १३ हजार पतसंस्थांमधील तब्बल १ कोटी ठेवीदांरांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी पतसंस्थांनी अर्ज करावेत, तसेच कार्यक्रमा दिवशी ठेवीच्या किमान ०.१ टक्के रक्कमेचा भाग भांडवलाचा धनादेश द्यावा असे आवाहन पतसंस्था फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे. ----------------लोकमतने ७ आॅगस्ट रोजी दिले होते वृत्तबँकांप्रमाणेच राज्यातील पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण मिळणार असल्याचे वृत्त लोकमतने ७ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असल्याने, राष्ट्रीय कृत, नागरी सहकारी, शेड्युल्ड, जिल्हा सहकारी अशा सर्व प्रकारच्या बँकांप्रमाणेच पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण प्राप्त होणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेBanking Sectorबँकिंग क्षेत्र