२ दिवसात २२ कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस

By राजू हिंगे | Updated: April 8, 2025 20:04 IST2025-04-08T20:01:18+5:302025-04-08T20:04:29+5:30

दिनानाथ रुग्णालयाला आता महापालिकेने दणका दिला असून गेल्या ८ वर्षापासून २७ कोटी मिळकतकर थकविल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे

Deposit Rs 22 crore within 2 days, otherwise confiscation action pune municipal corporation issues notice to Dinanath Hospital | २ दिवसात २२ कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस

२ दिवसात २२ कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस

पुणे : दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकतकराचे २२ कोटी रूपये थकित आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने या रूग्णालयाला जप्तीची नाेटीस पाठविली आहेत. त्यात मिळकत कराचे २२ काेटी रुपये दाेन दिवसांत जमा करावी अन्यथा पुढील कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाने नोटीशीदारे दिला आहे.

दिनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडे २७ कोटीचा मिळकत कर थकविला आहे. महापालिकेने मिळकत कर वसुल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी दिला हाेता. त्यामुळे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला आता महापालिकेने दणका दिला आहे. गेल्या आठ वर्षापासून महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकतकर थकविल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास नोटीस देण्यात आहे. एरंडवणा येथील सदर रुग्णालय हे लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनच्या मालकीचे आहे. या मिळकतीवर २०२४ - २५ या अार्थिक वर्षाअखेर सुमारे २७ काेटी ३८ लाख ६२ हजार ८७४ इतका मिळकत कर थकबाकी आहे. या मिळकतीवर आकारण्यात आलेली कर आकारणी मान्य नसल्याने फाऊंडेशनने २०१६-१७ साली महापालिकेविरुद्ध न्यायालयात दाद मागितली हाेती. सदर दाव्यात फाऊंडेशनने मिळकत करात समाविष्ट असलेल्या जनरल टॅक्सच्या पन्नास टक्के रक्कम आणि इतर कर भरण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार २०१४ ते २०२५ अखेर फाउंडेशनकडे एकुण २२ काेटी ६ लाख ७६ हजार ८१ रुपये इतकी मिळकत कराची थकबाकी आहे.

मिळकत कराची थकबाकी वसुल करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत सदर मिळकतीवर जप्तीची कारवाई करावी असे ताेंडी आदेश देण्यात आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनला नाेटीस बजावली आहे.

Web Title: Deposit Rs 22 crore within 2 days, otherwise confiscation action pune municipal corporation issues notice to Dinanath Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.