शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी दुपारी २ वाजता प्रस्थान 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 12:40 PM

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत...

देहूगाव (पुणे) : येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे  शनिवारी दुपारी दोन वाजता प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे यांनी दिली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या प्रस्तानासाठी उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक देहू नगरीत येऊन दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम-  पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल रुख्मिनी देवता, श्री संत तुकाराम महाराज महापूजा व शिळामंदिर पूजा पालखी सोहळा प्रमुख व संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या हस्ते होईल. पहाटे ५.३० वाजता तपोनिधी नारायण महाराज पालखी सोहळ्य़ाचे जनक यांच्या समाधीची महापूजा संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्थांच्या हस्ते होईल. सकाळी १० ते १२ वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याच्या किर्तन होईल. सकाळी ९ ते ११ वाजता तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन, महापूजा इनामदार वाड्यात होईल. दुपारी २ वाजता पाललखी प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरवात होईल. पालखी प्रस्थान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल.  सायंकाळी ५ वाजता पालखी मुख्य मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून बाहेर पडेल. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात जाईल. तेथे सायंकाळची मुख्य आरती होईल.

आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून यंदा वारीमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिले असून त्या दृष्टीने श्री संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. विद्यूत व्यवस्था करण्यात आली आहे. नदीच्या घाटावर आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची एक तुकडी २४ तास लक्ष ठेवून असणार आहे. जीवरक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय प्रासंगिक कामे मात्र सुरुच राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022