पुणे : पत्नीला ब्लू फिल्म दाखवत पत्नीला अनैसर्गिक शारीरिक संबंधाची मागणी करणाºया पतीला कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला आहे. दरमहा १५ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. याबाबतची हकिकत अशी, या खटल्यातील दोघेही नात्यातील आहेत. ५ वर्षांपूर्वी त्यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह झाला. तो नोकरी करतो. तर ती गृहिणी आहे. त्याचे मोठे घर असून त्याचे आई-वडीलही नोकरी करतात. लग्नानंतर तो तिला ब्लू फिल्म दाखवत असत. मात्र, तिला हे पाहणे आवडत नव्हते. त्यामुळे दोघात वाद झाला. यातून लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच ती माहेरी निघून गेली. ती पुन्हा परत आलीच नाही.या प्रकारामुळे दोघांना एकत्र आणण्याचे दोन्हीकडच्या नातेवाईकांचे प्रयत्न निष्फळ ठरले़. फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड गणेश कवडे यांनी तिच्या वतीने पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयात त्याने आपल्याकडे पोटगी देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले़. तेव्हा मुलाच्या राहत्या घराचा फोटो, त्याच्या नावावर असलेली मोटार, तसेच मोटारसायकलची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. त्यावेळी घेतलेल्या उलट तपासणीत घर असून, नोकरी करत आहे. तसेच खासगी मंदिराचे उत्पन्न असल्याचे अॅड़. कवडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तो परदेशात विमानाने फिरत होता. हे त्याने टाकलेल्या फेसबुकवरील पोस्टने उघड झाले. याबाबत उलट तपासणीमध्ये त्याने त्याची कबुली दिली. त्यानुसार न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल देत तिला दरमहा १५ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.
पत्नीला ब्लु फिल्म दाखवत अनैसर्गिक संबंधांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 20:31 IST
लग्नानंतर तो तिला ब्लू फिल्म दाखवत असत. मात्र, तिला हे पाहणे आवडत नव्हते...
पत्नीला ब्लु फिल्म दाखवत अनैसर्गिक संबंधांची मागणी
ठळक मुद्देन्यायालयाचा आदेश : दरमहा १५ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश५ वर्षांपूर्वी त्यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह दोघांना एकत्र आणण्याचे दोन्हीकडच्या नातेवाईकांचे प्रयत्न निष्फळ