पाटसला आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:02+5:302021-08-23T04:14:02+5:30

दौंड तालुक्यातील पाटस मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. येथील निवासी लोकसंख्या ही सुमारे ३० ते ३५ हजारांच्यावर आहे. परिणामी ...

Demand to start a health center for Patsala | पाटसला आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी

पाटसला आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी

दौंड तालुक्यातील पाटस मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. येथील निवासी लोकसंख्या ही सुमारे ३० ते ३५ हजारांच्यावर आहे. परिणामी कोरोना आणि इतर रोगांच्या पार्श्वभूमीवर येथील आरोग्यव्यवस्था अगदीच तोकडी आहे तर सरकारी दवाखान्यात डॉक्टर्स, नर्सेस यांचा मोजकाच स्टाफ आहे. तातडीच्या उपचारासाठी रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकादेखील पाटससारख्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात नेईपर्यंत प्राणास मुकावे लागत आहे, परिसरातील नागरिकांना सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध होण्यासाठी

प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची आवश्यकता आहे.

या वेळी पाटस ग्रामतलावाचे सुशोभीकरणाविषयी बोलताना राहुल कुल म्हणाले की पाटसचा तलाव हा पर्यटन विकास निधीत बसवून निधी उपलब्ध करून दिला जाईल, भविष्यात पाटसचा तलाव एक पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आणला जाईल असे स्पष्ट केले. या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तानाजी दिवेकर, पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे विनोद कुरुमकर, हर्षद बंदीष्टी, जुनेद तांबोळी, राजू गोसावी उपस्थित होते.

२२ पाटस

पाटस येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करावे, या मागणीचे निवेदन देताना ग्रामस्थ.

Web Title: Demand to start a health center for Patsala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.