शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

तुकाराम महाराजांविषयीही आक्षेपार्ह लिखाण, विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 11:14 PM

शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये वाटप करण्यासाठी निवडण्यात आलेल्या आणखी एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे : शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये वाटप करण्यासाठी निवडण्यात आलेल्या आणखी एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. संतांचे जीवन प्रसंग या पुस्तकात तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख करण्यात आले आहेत. गोपीनाथ तळवलकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.सर्व शिक्षा अभियानातील 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण असल्याचे गुरुवारी उजेडात आले. त्यापाठोपाठ आता दुस-या पुस्तकात तुकाराम महारांजाबाबत आक्षेपार्ह उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहमी शिव्याच बाहेर यायच्या. ह्यत आमचं येडं  असं आपल्या पतीला ती म्हणायची. पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले, असा आक्षेपार्ह उल्लेख या पुस्तकात आहे.संभाजी ब्रिगेडने यावर तीव्र आक्षेप घेतला असून संत तुकाराम आणि संभाजी महाराजांची बदनामी सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकातून केली जाते आहे. चुकीची माहिती पुढे पसरवली जाते आहे. अशा मजकुरांमधून चुकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे