शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात रसाळ फळांना मागणी ; दरही वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 11:28 IST

कलिंगड, खरबूज, डाळींब, मोसंबी आणि लिंबांना उन्हामुळे मागणी वाढल्यामुळे दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देउन्हामुळे फुलांची आवक झाली कमी

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी बाजारात कलिंगड, खरबूज, डाळींब, मोसंबी आणि लिंबांना उन्हामुळे मागणी वाढल्यामुळे दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पपईची मागणी घटल्याने दर दहा टक्क्यांनी घट झाली आहे़ तर सफरचंद, चिक्कू, अननस, पेरू, स्ट्रॉबेरी, बोरे, संत्रा आणि द्राक्षांचे दर मात्र स्थिर होते़  स्ट्रॉबेरीचीही आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. तर लिंबांना ज्युस विक्रेते आणि रसवंतीगृहांकडून मागणी वाढली असल्यामुळे दरामध्ये वाढ झाल्याची माहिती व्यापारी रोहन जाधव यांनी दिली़ बाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, मोसंबी ५५ ते ६० टन, संत्री ४० टन, डाळिंब १५० टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, चिक्कू दोन हजार डाग, पेरू चारशे क्रेट्स, कलिंगड ३० ते ३५ टेम्पो, खरबूज १५ ते २० टेम्पो, सफरचंद दीड ते २ हजार पेटी, बोरे १०० गोणी, स्ट्रॉबेरी तीन ते चार टन आणि द्राक्षांची ५० ते ५५ टन आवक झाली.----------------------------------उन्हामुळे फुलांची आवक झाली कमीमार्केटयार्डातील फुलबाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांची आवक घटली असून मागणीही घटली आहे. त्यामुळे गुलछडी वगळता सर्वच फुलांचे भाव दहा ते वीस टक्क्यांनी  घटले आहेत़ गेल्या आठवड्यात महाशिवरात्री होती त्यामुळे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी होती़ मात्र त्यानंतर मागणी घटली आहे़ फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-३०, गुलछडी : ८० ते १२०, बिजली : ५-२०, कापरी : १०-३०, कागडा : १००-२००, मोगरा : ३००-६००, आॅस्टर : ५-१५, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिली बंडल : ५-१०, जबेरार् : १०-४०, कार्नेशियन : ४०-६०.-------------------------

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डfruitsफळे