औषध निर्माण अधिकाऱ्यांना समान वेतन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:08 IST2021-06-26T04:08:57+5:302021-06-26T04:08:57+5:30

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान) यांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागणी मध्ये २००८ पासून (एनआरएचएमसी) अंतर्गत ...

Demand for equal pay for drug manufacturing officers | औषध निर्माण अधिकाऱ्यांना समान वेतन देण्याची मागणी

औषध निर्माण अधिकाऱ्यांना समान वेतन देण्याची मागणी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान) यांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागणी मध्ये २००८ पासून (एनआरएचएमसी) अंतर्गत वय वर्ष ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना असणाऱ्या दुर्धर गंभीर आजार (हृदय, श्रवणयंत्र बसविणे व इतर आजार) असणाऱ्या बालकांना शासनाच्या योजनांमार्फत मोफत शस्त्रक्रिया करून देत आहे. आज पर्यंत हजारो शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर सध्या कोरोना महामारीच्या काळात आम्ही आरोग्य सेवेत कायम असणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने अहोरात्र काम केले आहे. आम्हाला कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान (आरबीएसके) मधील कर्मचारी सध्या आरटीपीसीआर तपासणी, औषध देणे, वॉर्ड ड्युटी, सर्व्हे करणे अशी अतिरिक्त कामे सध्या कोरोना काळात करत आहे.

याबाबत पवार यांच्याकडे डॉ. हर्षल त्रिवेदी, डॉ. नीता हडपकर, डॉ. मनीषा खाडे तसेच औषध निर्माण अधिकारी अनिता पानगावे, विराज जगताप, पूनम चावरे, सागर पवार, विकास सोळसे, सुजित पिंगळे, विक्रम पोतदार यांनी निवेदन दिले आहे.

Web Title: Demand for equal pay for drug manufacturing officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.